मुंबई

स्मशानभूमी बंद करण्याच्या निर्णयाला मनसेचा विरोध

CD

स्मशानभूमी बंद करण्याच्या निर्णयाला मनसेचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ ः मोक्षधाम स्मशानभूमी नूतनीकरणासाठी काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात मनसेच्या वतीने सोमवारी (ता. १) महापालिका प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मनसेच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना भेटून या निर्णयाबाबत जाब विचारला. नागरिकांना पर्यायी व्यवस्था नीट उपलब्ध होत नाही, तोपर्यंत ही स्मशानभूमी बंद करण्यात येऊ नये, अशी ठाम भूमिका मनसेने मांडली आहे.
डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर येथील मोक्षधाम स्मशानभूमीची पालिकेच्या वतीने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या कामासाठी सोमवारपासून ही स्मशानभूमी बंद ठेवण्यात येणार होती. यामुळे नागरिकांना पर्यायी स्मशानभूमीचीदेखील व्यवस्था करण्यात आल्याचे पालिकेने जाहीर केले होते, मात्र पर्यायी जागेच्या ठिकाणी योग्य सोयीसुविधा नसल्याने यावर मनसे शिष्टमंडळाकडून आक्षेप घेतला आहे.
महापालिकेने शहरातील काही स्मशानभूमींच्या जागा निश्चित केल्या असल्या तरी त्या ठिकाणी प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. पाणी, वीज, साफसफाई, शेड, सुरक्षा अशी मूलभूत पायाभूत सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत मोक्षधाम स्मशानभूमी नूतनीकरणाच्या कारणावरून तात्पुरते बंद करण्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या वेळी मनसेचे शहरातील पदाधिकारी, महिला सेना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

... तर मनसेशी गाठ
नूतनीकरणासाठी स्मशानभूमी बंद करण्यापूर्वी इतर सर्व स्मशानभूमींमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे आणि २४ तास कर्मचारी नियुक्त करणे अत्यावश्यक आहे. स्मशानभूमी बंद करण्यापासून पुन्हा सुरू होईपर्यंतचा स्पष्ट कालावधी महापालिकेने जाहीर करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. या चर्चेदरम्यान महापालिका प्रशासनाने स्मशानभूमी चर्चेनंतरच बंद केली जाईल, असे आश्वासन दिले, मात्र शिवमंदिर स्मशानभूमी कायमस्वरूपी बंद करण्याचा कोणताही प्रयत्न केला, तर मनसेशी गाठ आहे, अशी ताकीद मनसेने प्रशासनाला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT