मुंबई

मतदानासाठी प्रशासन सज्ज!

CD

एका मतदाराला एक मिनिट
मतदानासाठी बदलापूर सज्ज; दोन लाख २५ हजार ३५५ मतदार बजावणार हक्क
बदलापूर, ता. १ : स्थगितीमुळे पाच प्रभागांतील पॅनेलला धक्का लागल्याने उडालेल्या गोंधळात सुमारे सव्वादोन लाख बदलापूरकर आज २ डिसेंबरला आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नगराध्यक्षपदासह ४४ उमेदवारांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पॅनेल पद्धतीने कुळगाव-बदलापूर नगर परिषदेसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार असून, त्यासाठी प्रशासनाने सर्व २४ प्रभागांमध्ये २४१ मतदान केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक केंद्रात ९०० मतदार अशी व्यवस्था आहे. परिणामी एका मतदाराला अवघ्या एका मिनिटाचाच मतदानासाठी कालावधी मिळणार असून, त्याला नगराध्यक्ष दोन उमेदवारांसाठी मतदान करावे लागणार आहे.

१० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर अखेर बदलापूर नगर परिषदेसाठी उद्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. घरोघरी प्रचार, बॅनरबाजी, घोषणा, चौकसभा, भव्य रॅलीने संपूर्ण शहरात धुरळा उडाला. दुसरीकडे पैसे वाटपाचा मुद्दाही गाजला. आरोप-प्रत्यारोप ते हाणामारीपर्यंत मजल गेली. या सर्व राजकीय नाट्याला मतरूपी ‘गुण’ बदलापूरकर उद्या देणार आहेत.

ईव्हीएमची तयारी पूर्ण
कुळगाव-बदलापूर नगर परिषद निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएमची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षणासाठी व मतदानासाठी लागणाऱ्या कंट्रोल युनिट (सीयू) आणि बॅलेट युनिट (बीयू) मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध असून, स्ट्राँग रूममध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे.
- २४१ केंद्रांसाठी २४ राखीवसह २८९ कंट्रोल युनिट तयार ठेवण्यात आले आहेत.
- ४७८ बॅलेट युनिट सज्ज आहेत.
- मशिनसाठी आवश्यक एकूण २९५ मेमरी चिप्स उपलब्ध असून, त्या पुरेशा असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रभाग क्रमांक १०मध्ये सर्वाधिक १५ उमेदवार
नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १०मध्ये सर्वाधिक १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक १८मध्ये १४, तर प्रभाग क्रमांक ८ आणि १३मध्ये प्रत्येकी १३ उमेदवार आहेत.
- एकूण १२ प्रभागांत ११७ मतदान केंद्रे असून, येथे स्पर्धक उमेदवारांची संख्या १० किंवा त्याहून कमी असल्याने एकच बॅलेट युनिट पुरवण्यात आले आहे. उर्वरित १२ प्रभागांत १२४ मतदान केंद्रे असून, येथे उमेदवारसंख्या जास्त असल्याने दोन बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्ट्राँग रूम आणि सुरक्षा व्यवस्था
ईव्हीएम प्रशिक्षणासाठी कुळगाव-बदलापूर मुख्यालयातील स्ट्राँग रूम वेगळी ठेवण्यात आली आहे.
मतदानासाठीच्या ईव्हीएमची स्ट्राँग रूम बदलापूर नगर परिषद मुख्य कार्यालयात आहे.
स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्हीची पूर्ण व्यवस्था केली आहे.

मतदारांची कसोटी
बदलापूरकर पहिल्यांदाच पॅनेल पद्धतीने मतदानाला सामोरे जाणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी दोन असे एकूण तीन वेळा मशिनची कळ दाबून मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे गोंधळ उडणार नाही याची खबरदारी प्रशासनासह राजकीय पक्षही घेत आहेत.

प्रत्येक सेकंद महत्त्वाचा
प्रत्येक बूथमध्ये सरासरी ९०० मतदार आहेत. एका मतदाराला तीन वेळा मतदान करायचे आहे. सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच या साडेदहा तासांच्या कालावधीमध्ये प्रत्येक मतदाराला किमान एक मिनिटाचा कालावधी मिळावा, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्रत्येक मतासाठी ३० सेकंद असा हिशेब त्यासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे मतदार आणि उमेदवारासाठी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रशासनाची चोख व्यवस्था
मतदान सुरक्षितपणे पार पडावे, यासाठी प्रशासनाकडून दीड हजाराहून जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून सगळ्याच मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या वेळी मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यासाठीच अनेक मतदान केंद्रे शाळा असून, जी मतदान केंद्र मोकळ्या जागेत असतील त्या ठिकाणी मंडपाची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाकडून जे कर्मचारी नेमण्यात आले आहेत त्यांच्यासाठी राहण्याची, नाश्‍ता, जेवण या सगळ्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रमुख ठळक मुद्दे
तपशील संख्या/माहिती
मतदानाचा दिवस २ डिसेंबर (सकाळी ७ वाजल्यापासून)
एकूण मतदार २,२५,३५५
मतदान केंद्रे (बूथ) २४१
मतदार प्रति बूथ ९००
मतदान होणाऱ्या जागा ४३ (एकूण ४९ पैकी ६ जागांवर मतदान स्थगित)
कर्मचारी तैनात दीड हजाराहून जास्त
सुरक्षा कक्षाचे ठिकाण आदर्श विद्या मंदिर, दुसरा मजला, कक्ष क्र. १ (बदलापूर पूर्व)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT