मुंबई

अवघ्या २ ते ३ महिन्यात मिळणार नोकरी

CD

अवघ्या दो ते तीन महिन्यांत मिळणार नोकरी
वारसाहक्काच्या नियुक्त्यांना गती; ठाणे पालिकेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : महापालिकेत वारसाहक्काने नोकरी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे दार ठोठवणाऱ्या वारसांना आता दिलासा मिळणार आहे. महापालिकेने नवीन प्रणाली राबवण्याची तयारी सुरू केली असून, येत्या काळात वारसाला नोकरी मिळण्यासाठी केवळ दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महापालिकेतून दरवर्षी सुमारे ८०० ते ९०० कर्मचारी सेवानिवृत्त होतात. विशेषतः सफाई कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करावे लागत होते. काही जणांची वयोमर्यादा संपल्यानंतरदेखील प्रकरणे प्रलंबित राहिल्याने अनेकांना खासगी नोकरीकडे वळावे लागत होते. त्यातही अनेक जण ठोक वेतनावर १०-१२ वर्षे काम करीत असूनही नियमित नोकरीचे स्वप्न पूर्ण होत नव्हते. महापालिकेने अखेर या समस्येवर उपाय करीत वारसाहक्काची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २०२३ पर्यंतची ३५० प्रकरणे, २०२४ मधील ७० प्रकरणे, मार्गी लावली असून, २०२५ मधील ६५ प्रकरणे अंतिम टप्प्यात आहेत. वारसा हक्काची इतकी मोठी प्रकरणे निकाली काढणारी ठाणे महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.

प्रक्रियेला असा येणार वेग
प्रभाग समितीनिहाय वारसाहक्काची प्रकरणे स्वीकारली जाणार, संबंधित ठिकाणी कागदपत्रे तपासून प्रकरणे तयार केली जाणार, त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी ती महापालिका मुख्यालयाकडे पाठवली जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेस फक्त दोन ते तीन महिने लागतील. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच कालावधीत महापालिकेच्या सेवेत सामावून घेता येणार आहे. या निर्णयामुळे वारसांना मिळणाऱ्या नोकरीची वाट आता मोठ्या प्रमाणात सुकर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगावच्या दरेगाव शिवारात 'विषाचा' धूर! अवैध प्लास्टिक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

IPL 2026 Updates: गतविजेत्या RCB चे सामने मुंबईनंतर पुण्यातही नाही होणार! ५ सामने एकीकडे, तर २ दुसरीकडे; जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज

Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे रंग बदले, उद्धव संग मंच पे चढले...' गुणरत्न सदावर्ते यांची होळीनिमित्त राजकीय कविता; Video Viral

Video: ७० वर्षांच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; तरुण जावई पळून गेला अन्...

स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप, चार वर्षांनी गोलंदाजीतील इक्लेस्टोनचं सिंहासन खालसा

SCROLL FOR NEXT