मुंबई

डोंबिवली स्थानकाच्या बाहेरील “डोंबिवली” नाव गायब

CD

स्थानकाबाहेरील ‘डोंबिवली’ नावच गायब
तत्काळ दुरुस्तीची शिवसेनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ ः डोंबिवली रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण, प्लॅटफॉर्म रुंदीकरण, जिने, एस्कलेटर, पत्र्याची शेड यांसारखी कोट्यवधींची कामे अंतिम टप्प्यात असताना स्थानकाच्या ओळखीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेकडील एकूण आठ प्रवेशद्वारांवरून मूळ ‘डोंबिवली’ नाव हटवण्यात आले असून, केवळ नाट्यनगरी, नृत्यनगरी, साहित्यनगरी अशा शहराला मिळालेल्या उपमा फलकांवर झळकत आहेत. त्यामुळे नागरिक व प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे डोंबिवली पश्चिम उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे यांनी भारतीय मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना आणि वरिष्ठ मंडळ अभियंता शांतीलाल यांची भेट घेऊन तत्काळ ‘डोंबिवली’ हे मूळ नाव पूर्ववत लावावे, अशी लेखी मागणी केली. नागरिकांच्या वर्गणीतून शिवसेनेतर्फे स्वतंत्र नामफलक बसवण्याचा इशाराही त्यांनी दिला.
कांबळे यांनी रेल्वेतील सुरू असलेल्या विविध कामांच्या संथ गतीवरही नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानकातील कामांची गती वाढवावी अन्यथा शिवसेना स्टाइल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, गेल्या वर्षी निवडणूक काळात अर्धवट कामांचा लोकार्पण सोहळा कसा पार पडला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. निवडणुकीला वर्ष उलटूनही शहरातील खड्डे, ट्रॅफिक, पाणीटंचाई, वीज समस्या यांसारख्या मूलभूत अडचणी वाढत चालल्या आहेत. सत्ताधारी आमदार-खासदार असूनही शहराच्या विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही कांबळे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : इस्त्राईलला धोक्याची घंटा

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Beetroot Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

SCROLL FOR NEXT