तारापूर मार्गावर अपघात
तरुणाचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी
तारापूर, ता. १ (बातमीदार) : तारापूर बाह्यवळण मार्गावर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या तरुणांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
तारापूर-चिंचणी बाह्यवळण मार्गावर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. बोईसरकडून चिंचणीकडे जाणाऱ्या भरधाव इनोव्हा कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कारच्या धडकेत दुचाकीवरील पीयूष आरेकर (१६), आर्यन जाधव (१८), हर्षित पाटील (१४) आणि मानस आरेकर (१६) हे चार तरुण गंभीर जखमी झाले होते.
अपघातात जखमी झालेल्या तरुणांना उपचारासाठी बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र जखमींपैकी पीयूष आरेकर या तरुणाचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. इतर तरुणांवर उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी सर्व तरुण पालघर तालुक्यातील अकरपट्टी व पोफरण गावातील राहणारे असून, दुचाकीवरून घराकडे परतताना हा अपघात घडला. अपघातात कार आणि दुचाकी असे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातप्रकरणी इनोव्हा कारचा चालक शरद ठाकूर याच्यावर तारापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. अपघातास कारणीभूत चालकाच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रक्ताचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर चालकाने मद्यपान केले होते किंवा नाही हे समजू शकणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.