मुंबई

मुंबई– अहमदाबाद मार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

CD

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू
मनोर, ता. १ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाडा खडकोना गावाच्या हद्दीत सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेआठच्या सुमारास महामार्गाच्या मुंबई वाहिनीवरील अलवर मेवात धाब्याजवळ ही दुर्घटना घडली. भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर पडले आणि ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. अपघातात दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला.
मृतांमध्ये भाऊराव बुंदे (वय ३५, रा. करसोड गावठाण पाडा, ता. विक्रमगड, जि. पालघर) आणि एकनाथ (वय ३०) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच मनोर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी त्यांना मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अपघाताला कारणीभूत ठरलेले अज्ञात वाहन आणि त्याचा चालक फरार आहेत. वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT