२० वर्षांपासूनच्या लढाईला यश
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : हार्बर रेल्वेमार्गावरील प्रसिद्ध आणि अत्याधुनिक अशा सीवूड्स दारावे रेल्वेस्थानकाला करावे गावाचे नाव लागणार आहे. यासाठी माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला होता. अखेर २० वर्षांपासून सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले आहे.
हार्बर रेल्वेमार्गावर नेरूळ रेल्वेस्थानकानंतर थेट सीबीडी-बेलापूर हे रेल्वेस्थानक होते. यादरम्यान असणाऱ्या दारावे आणि करावे या गावादरम्यान सिडकोने रहिवासी वसाहतीची निर्मिती केली. कालांतराने या भागाचा विकास झाल्यानंतर लोकसंख्या वाढली. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नेरूळ रेल्वेस्थानकाहून प्रवास करावा लागत होता, परंतु नंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नेरूळ आणि बेलापूर या दोन रेल्वेस्थानकांदरम्यान आणखीन एक रेल्वेस्थानक तयार केले. त्याला सीवूड्स-दारावे असे नाव दिले. २००५ला रेल्वेस्थानकाचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत या रेल्वेस्थानकाला शेजारच्या करावे गावाचेही नाव लागावे, अशी मागणी स्थानिकांची होती. मुळात ज्या जमिनीवर रेल्वेस्थानक उभे राहिले आहे, त्या शेतजमिनी करावे गावातील ग्रामस्थांच्या होत्या. त्यामुळे या रेल्वेस्थानकाच्या नावामध्ये दारावे सोबत करावे गावाच्या नावाचाही समावेश व्हावा, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी सरकार दरबारी केली होती. गेली अनेक वर्षे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठ पुरावा केल्यानंतर अखेर केंद्र सरकारने सीवूड्स दारावे नावासोबत करावे गावच्या नावाचाही समावेश करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या निर्णयामुळे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
--------------------------------------
रेल्वेस्थानकाला सीवूड्स दारावे नावासोबत करावे गावचे नाव लावण्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता. वनमंत्री गणेश नाईक यांनी अनेकवेळा सरकार पाठपुरावा करण्यास मदत केली. या निर्णयामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.