ठाण्यात महाविकास आघाडीची एकजूट
काँग्रेसचा सक्रिय सहभाग!
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : एकीकडे ठाणे जिल्ह्यात महायुतीमधील (भाजप आणि शिंदे गट) घटक पक्षांमध्ये मोठा संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना दुसरीकडे मात्र ठाण्यात महाविकास आघाडी (मविआ) एकजुटीचा संदेश देत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीने प्रभागनिहाय बैठका सुरू केल्या असून, यात काँग्रेसचाही सक्रिय सहभाग दिसून येत आहे.
मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील जवळीक व जागावाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा असताना, ठाण्यात मात्र चित्र पूर्णपणे उलट आहे. ठाण्यात भाजप आणि शिंदे गट परस्परांचा समाचार घेत स्वबळाचा नारा देत आहेत. यामुळे महायुतीत संघर्ष उफाळून आला आहे. याउलट मविआने शहरात एकजुटीचा संदेश देत जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. प्रभागनिहाय बैठकांमध्ये स्थानिक मुद्द्यांवर सामूहिक धोरण आखण्यास सुरुवात झाली आहे.
प्रमुख पक्षांचे पदाधिकारी एकत्र
प्रभाग क्रमांक १४ मधील सावरकरनगरमध्ये आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिवसेना (ठाकरे गट), शरद पवार गट, मनसे आणि काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी एकत्र आले. यामुळे ठाण्यात महाविकास आघाडीच्या एकत्रीकरणाला चालना मिळाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
निवडणुकीची तयारी
ठाण्यात उद्धव सेना आणि मनसे एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत. त्यात शरद पवार गटाचाही सहभाग जवळपास निश्चित मानला जात आहे. या अनुकूल परिस्थितीत काँग्रेसही आघाडीत राहण्यास इच्छुक असल्याचे समजते. शरद पवार गटालाही ठाण्यात स्वतःची राजकीय जागा टिकवण्यासाठी उद्धव सेना आणि मनसेसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
प्रभागनिहाय बैठका
स्थानिक निर्णयाचे अधिकार जिल्हा अध्यक्षांकडे आहेत. ठाण्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण असेल, तर त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिली. दरम्यान, प्रभागनिहाय बैठकीला सुरुवात केली असून, पहिली बैठक प्रभाग १४मध्ये पार पडली. एकत्र येणे आणि मनोमिलन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच या बैठका घेतल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया मनसेचे ठाणे उपाध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.