आता पुढील स्थानक ‘सीवूड्स-दारावे-करावे’
सीवूड्स-दारावे स्थानकाच्या नावात बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : नवी मुंबईतील प्रवाशांसाठी महत्त्वाचे असलेले सीवूड्स-दारावे स्थानक आता अधिकृतरीत्या ‘सीवूड्स-दारावे-करावे’ या नव्या नावाने ओळखले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेनंतर, भारतीय रेल्वेने हा प्रस्ताव मंजूर करून बदलाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या बदलामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी आणि परिसराशी संबंधित विविध शासकीय नोंदी आता नव्या नावाने अद्ययावत करण्यात येणार आहेत.
राज्य सरकार आणि भारताच्या सर्व्हेअर जनरल यांच्या पत्रानुसार स्थानकाचे नवीन नाव मराठी आणि हिंदी लिपीत सीवूड्स-दारावे-करावे, असे नोंदवले जाईल. नव्या नावासाठी रेल्वेने स्थानक कोडदेखील बदलून SWDK असा केला आहे. हा कोड तिकिटे, वेळापत्रक, रेल्वे चार्ट, नकाशे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर वापरला जाईल.
-----
नावबदल प्रक्रिया टप्प्याटप्प्याने
रेल्वेनुसार नावबदल प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे. स्थानक परिसरातील दिशादर्शक फलक, प्लॅटफॉर्मवरील पाट्या, स्थानकवरील घोषणा प्रणाली, प्रवासी माहिती प्रणाली, तसेच ॲप्स आणि वेबसाईटवरील डेटाही आता नव्या नावानुसार बदलला जाणार आहे. काही ठिकाणी कामाला सुरुवात झाली असून, उर्वरित बदल लवकरच पूर्ण होतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.