नोकरीचे प्रलोभन दाखवत १२ विद्यार्थ्यांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : नोकरी लावतो, असे प्रलोभन दाखवत तब्बल १२ विद्यार्थ्यांकडून एक हजार ते २० हजार अशा स्वरूपाची रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर घेत, त्या मुलांना नोकरी न लावता त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रशांत मुनी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार विजय डोईफोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते ठाण्यातील बोस्टन इन्स्टिट्यूट ऑफ ॲनॅलॅटिक्स या कंपनीत दोन वर्षांपासून संचालक या पदावर कार्यरत आहेत. त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशभरात प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यापैकी खोपट कॅडबरी जंक्शनसमोरील देव कॉर्पोरा येथे १३ व्या मजल्यावर कार्यालय आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या कोर्सेसची माहिती व्हावी तसेच त्यांना प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन व्हावे म्हणून कंपनीने मुंबईतील प्रशांत पद्माचरण मुनी याची २३ डिसेंबर २०२४ पासून नियुक्ती केली होती. त्याने जुलै २०२५पासून अचानक कामावर येणे बंद केले. याचदरम्यान, काही विद्यार्थ्यांचे कार्यालयात फोन येऊ लागले की, आमचे कोर्स पूर्ण झाले असून, फी भरलेली आहे तरीसुद्धा नोकरी लागली नाही. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर त्या विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या पैशाबाबतची माहिती घेऊन खात्री केली असता, मुनी याने नेमलेल्या पदाचा गैरवापर करून अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.