पत्रकार जे. डे हत्या प्रकरण
छोटा राजनच्या अपिलावर
३ जानेवारीपासून सुनावणी
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. १ : पत्रकार ज्योतिर्मय ऊर्फ जे. डे यांच्या हत्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड छोटा राजनसह अन्य आरोपींनी शिक्षेविरोधात केलेल्या अपिलावर ३ जानेवारीपासून अंतिम सुनावणी घेणार असल्याचे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.
या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपींपैकी काहींच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी न्या. भारती डांगरे आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला. राजनसह अन्य आरोपींनी दाखल केलेल्या अपिलावर ३ जानेवारीपासून अंतिम सुनावणी घेण्याचे नमूद केले. याप्रकरणी सर्व दोषसिद्ध आरोपी कारागृहात असून, एकाची प्रकरणातून सुटका झाल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. विशेष मकोका न्यायालयाने २०१८मध्ये राजन आणि इतर आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला राजनसह नऊ दोषसिद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. चार दोषसिद्ध आरोपींनी यापूर्वी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. तथापि, न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांची याचिका फेटाळली होती, तर आणखी एका आरोपीने जामिनाची याचिका मागे घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.