मुंबई

अंबरनाथ निवडणूक स्थगितीने राजकारण तापले

CD

अंबरनाथ निवडणूक स्थगितीने राजकारण तापले
अंबरनाथ ता. १ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक स्थगित झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सूर तीव्र झाला असून, स्थगितीला कोण जबाबदार? या प्रश्नावरून दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी एकमेकांवर थेट निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वाळेकर कुटुंबीयांमुळेच निवडणूक पुढे ढकलली गेली, असा थेट आरोप केला, तर अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनात शिरून आमदारासह सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या व भाजपच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत हंगामा केला. सर्व निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू असताना विनाकारण ही प्रक्रिया थांबवणे हे निषार्धात असून, सत्ताधारी व निवडणूक आयोगाचा निषेध दोन्ही पक्षाच्या वतीने करण्यात आला.
अंबरनाथ पूर्व येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करंजुळे यांनी सांगितले की, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी साधना वाळेकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर हरकत दाखल झाली आणि अपील प्रक्रिया सुरू असताना त्यांनी अर्ज माघारी घेतला, मात्र अपील दाखल झाल्याने निवडणूक आयोगाने जीआरप्रमाणे आणि नियमांनुसार संपूर्ण अंबरनाथ शहराची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली, असा दावा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुळे यांनी केला आहे. यामुळे शिवसेना-भाजपमधील तणाव अधिकच वाढला असून, राजकीय वातावरण पेटले आहे. निवडणूक आयोगाने अंबरनाथसह अपील दाखल झालेल्या सर्व नगर परिषदांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून, अंबरनाथची निवडणूक २० डिसेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
भाजपने या स्थगितीला विरोधकांची योजना ठरवत टीका केली असून,“एका कुटुंबाच्या निर्णयामुळे संपूर्ण शहराची निवडणूक अडली; हे अंबरनाथला २५ वर्षे मगे नेणारे पाऊल आहे,” अशी टीका अभिजित करंजुले यांनी केली. दरम्यान, भाजप-शिंदे गट आता सरळ आमनेसामने आले असून, येत्या काही दिवसांत आरोप-प्रत्यारोपांची लाट अधिक जोराने उठण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. अंबरनाथची निवडणूक एका अपीलमुळे स्थगित होणे हा अभूतपूर्व प्रकार असल्याने नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT