ठाणे पोलिसांचे डिजिटल पाऊल
‘डॅशबोर्ड’ सॉफ्टवेअर : एका क्लिकवर संपूर्ण आयुक्तालयाची माहिती
पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणे शहर पोलिसांनी ‘डॅशबोर्ड’ सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. यामुळे पोलिसांना आयुक्तालयातील तब्बल ३६ पोलिस ठाण्यासह विविध प्रशासकीय कामकाजाची इत्थंभूत माहिती पोलिस आयुक्तांना एका क्लिकवर मिळणार आहे. सध्या या सॉफ्टवेअरमध्ये एकूण १५ सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यात ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसंबंधित सेवाही समाविष्ट आहे. या अनोख्या उपक्रमाचे पोलिस महासंचालकांनी कौतुक केले आहे. त्यामुळे भविष्यात हा उपक्रम ‘ठाणे पॅटर्न’ म्हणून राज्यात नावरूपास येईल, अशीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून डॅशबोर्ड नावाचे एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्याच्यावर आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माहितीसह गुन्हे, सराईत गुन्हेगारांची माहिती, बीट मार्शल दिवसभरात किती वेळा गस्त घालतात, याशिवाय आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाज, विविध परवानाधारक, एवढेच नाहीतर पोलिस आयुक्तालयातील मॅरेज हॉल व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक ॲप तयार केला आहे, तर लवकरच रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिला-शाळकरी मुले यांच्या सुरक्षेसाठी ॲप तयार केले जाणार आहे. यामध्ये रिक्षा मालकासह चालक आणि बसचालकांसंदर्भात माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे.
बंदूक किंवा बार व इतर परवाने
पोलिस आयुक्तांसह संबंधित विभागाचे उपायुक्त, पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना ठाणे पोलिस आयुक्तलयात कोणकोणते किती परवानाधारक आहेत, हे समजले. याशिवाय पाच वर्षांनी नूतनीकरण करण्यासाठी परवानाधारकाला एक महिना आधी तारीख एसएसएमद्वारे मोबाईलवर कळवली जाईल. दोन ते तीन वेळा हे संदेश पाठवले जातील. तरीसुद्धा नूतनीकरण केले नाही, तर परवाना रद्द केला आहे, असा शेवटचा संदेश मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना आवाहन
ठाणे शहर पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारवड हा ॲप तयार केला आहे. हा ॲप डाऊनलोड केल्यावर त्यामधील एसओएस (sos) दाबल्यास तात्काळ संबंधित ज्येष्ठ नागरिकांची माहिती ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षेला मिळणार असून, त्यांना मदत उपलब्ध होणार आहे.
या सॉफ्टवेअरने पोलिस आयुक्तांना एका क्लिकवर इत्थंभूत माहिती उपलब्ध होईल. अवघ्या काही मिनिटांत आयुक्तालयातील दिवसभरामधील कामकाजाचा आढावा घेता येत आहे. नियोजित कामे, कोणाची ड्युटी कुठे आहे, किती मनुष्यबळ त्या दिवशी उपलब्ध आहे, आदी माहिती क्षणात मिळणार आहे. यामुळे कामात सुसूत्रता येण्यात मदतच होईल.
- डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलिस उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.