मुंबई

एचआयव्हीवरील जनजागृतीसाठी ‘मशाल’ उपक्रम

CD

एचआयव्हीवरील जनजागृतीसाठी ‘मशाल’ उपक्रम
१५० महाविद्यालयांत मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्हीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी महापालिकेकडून विशेष ‘जनजागृती मशाल’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. महापालिकेचे उपायुक्त शरद उघडे यांच्या हस्ते ही मशाल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती पोहोचावी, एचआयव्हीबाबतचे गैरसमज, कलंक आणि भेदभाव कमी व्हावा, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
मुंबईतील १५० पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये ही मशाल नेण्यात येणार असून, प्रत्येक महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवक आणि ‘रेड रिबन क्लब’च्या माध्यमातून एचआयव्हीविषयी माहिती, प्रतिबंध, उपचार, तसेच सामाजिक स्वीकृती या विषयांवर उपक्रम राबवले जातील. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या सहकार्याने चालणारा हा उपक्रम युवकांमधून युवकांपर्यंत जागरूकतेचा संदेश पोहोचवणारा ठरणार आहे. मशाल प्रतीकात्मक असली तरी अंधारात प्रकाश देण्यासारखे मार्गदर्शन, ऊर्जा आणि एकात्मतेचा संदेश ती देत असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. ‘चलो एकत्र, अडथळे पार करूया आणि विजयरथ पुढे नेऊया’ ही यंदाच्या एचआयव्ही जागतिक दिनाची संकल्पना लक्षात घेऊन हा उपक्रम आखण्यात आला आहे.

तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्‍न
मुंबईतील १५५ महाविद्यालयांशी संस्थेचे आरोग्य-जागृतीसंबंधित कार्य सुरू आहे आणि प्रत्येक महाविद्यालयात स्थापन केलेल्या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने माहिती, समज आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची जबाबदारी पेलली जाते. मशाल मोहिमेमुळे जागरूकतेची ही चळवळ अधिक प्रभावीपणे तरुणांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे अतिरिक्त प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. विजय करंजकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Hit-and-Run Case: नाशिकमध्ये पुण्यातील ‘पोर्श’सारखा थरार! CCTV मध्ये भीषण हिट अँड रन कैद; बड्या बापाचा अल्पवयीन मुलगा ताब्यात

Love Marriage Ban : गावाचा अजब निर्णय, लव्ह मॅरेजवर घातली बंदी; कुटुंबाचे अन्न-पाणी बंद, सामाजिक बहिष्कारही टाकणार

Latest Marathi News Live Update : मुलुंड पूर्व द्रुतगती मार्गावर तरुणांकडून धोकादायक स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून शोध सुरू

नवीन ट्विस्ट! पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरच उलटणार; बांगलादेaश T20 World Cup मध्ये परतणार, जय शाह करेक्ट कार्यक्रम करणार

ठाणे, रायगड, नंदुरबारला अवकाळी पावसाने झोडपलं; राज्यात ढगाळ वातावरण, आंब्यासह रब्बी हंगामातील पिकं धोक्यात

SCROLL FOR NEXT