मुंबई

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे शुक्रवारी आंदोलन

CD

पालघर, ता. २ (बातमीदार) : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनेचा राज्य समन्वय समितीच्या आंदोलनाला पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आणि पालघर जिल्हा शिक्षण संस्था पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. ५) धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य समन्वय समितीने शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी ५ डिसेंबरला आंदोलन व शाळा बंदचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, तसेच मुख्याध्यापक संघटना आणि पालघर जिल्हा शिक्षण संस्था संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. या दिवशी शिक्षक काळ्या फिती लावून अध्यापन करून दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांना देण्यात येईल.

संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व समन्वयक संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे गणेश प्रधान यांनी आवाहन केले आहे.

शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
- आरटीई कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी सेवेत दाखल शिक्षक कर्मचाऱ्यांना टीईटी उत्तीर्णची अट रद्द करावी.
- १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे होणारे शिक्षक समायोजन रद्द करावे.
- १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
- आदिवासी उपयोजन क्षेत्राच्या शाळांतील कर्मचाऱ्यांना एक स्तर योजना लागू करावी.
- राज्यातील शिक्षणसेवक योजना कायमस्वरूपी बंद करण्यात यावी.
- चतुर्थ श्रेणी कर्मचारी (शिपाई) यांच्या पगार वसुलीबाबतचा ३१ जुलैच्या शासन निर्णयास स्थगिती देत तो मागे घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Rupee Fall: भारतीय रुपया डॉलरसमोर पहिल्यांदाच ९० च्या खाली कोसळला! खरे कारण अन् परिणाम काय? जाणून घ्या सविस्तर...

Navi Mumbai: पाम बीच रोडवरील ट्रॅफिकला विराम लागणार! केसर सॉलिटेअर अंडरपासला ग्रीन सिग्नल; जाणून घ्या मार्ग...

Bangladesh: ''जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत..'', बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्याचं खळबळजनक विधान

Latest Marathi News Live Update : घुसखोरांविरुद्ध कारवाई सुरू, मुख्यमंत्र्यांचे डिटेंशन सेंटर बांधण्याचे आदेश

Datta jayanti 2025 Marathi Wishes: 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'... दत्त जयंतीनिमित्त नातेवाईक अन् मित्रपरिवाराला द्या भक्तीमयी शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक खास संदेश

SCROLL FOR NEXT