मुंबई

सारमाळ गावात राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर

CD

सारमाळ गावात राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर उत्साहात
शहापूर, ता. २ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील सारमाळ या गावात गुरुकुल महाविद्यालय, घाटकोपर यांच्यातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सातदिवसीय निवासी शिबिर घेण्यात आले. हे शिबिर २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पार पडले.
या शिबिरात एकूण १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या दरम्यान योग प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, पथनाट्य, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप आणि महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ असे विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी वासिंद स्मशानभूमी परिसरात साफसफाई केली तसेच सारमाळ गावाच्या नदीवर केटी बांधारा तयार करून जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण काम केले.
या शिबिरात वासिंद पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, आंतरराष्ट्रीय वक्ते दिनेश गुप्ता आणि राजेंद्र कोळी यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ममता राणे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि सारमाळ गावातील पोलिस पाटील रामदास राव, ग्रामस्थ, बचत गटाच्या महिला, साईबाबा सेवा मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

वाहन नोंदणी-लायसन्सची माहिती आता व्हॉट्सअ‍ॅपवर; परिवहन विभागाची नवी सेवा, २४x७ चॅटबॉट सुरू होणार

Sangli Gas Cylinder : ‘आमचा गॅस सिलिंडर कुणी पळवला?’ ग्राहकांचा संताप एजन्सींचा काळा बाजार, सर्वत्र लागल्या रांगा

Education News : पुढील तीन वर्षांत पहिली ते बारावीचा कायापालट; जाणून घ्या तुमच्या पाल्याच्या इयत्तेचा नंबर कधी?

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

SCROLL FOR NEXT