मुंबई

तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

CD

तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मागील काही महिन्यांत अनेक गंभीर अपघात; पालिका प्रशासनावर नाराजी
विरार, ता. २ (बातमीदार) ः वसई-विरार शहरांना तलावांची शहरे म्हणून ओळख आहे. या तलावांच्या सुरक्षेकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर अपघातांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. नुकतीच विरार फुलपाडा परिसरातील महापालिकेच्या तलावाजवळ खेळत असताना ११ वर्षीय सार्थक मोरे याचा सुरक्षा जाळी तुटल्याने पाण्यात पडून मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर शहरातील सर्व तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात तब्बल १०७ तीर्थ तलाव असून, त्यांचे पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करण्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. सुरुवातीच्या काही वर्षांत तलाव उद्यान परिसर अतिशय आकर्षक झाला होता. नागरिक सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी, तर मुले खेळण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असत. काळाच्या ओघात देखभाल आणि दुरुस्ती पूर्णपणे थातुरमातुर झाल्याने अनेक तलाव परिसरांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा जाळ्या तुटल्या असून खेळणी-व्यायाम साहित्य मोडकळीस आले आहे. काही ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघातांच्या घटना सतत घडताना दिसून येत आहेत. नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप चौधरी यांनी केला. देखभाल व्यवस्थित न करताही लाखोंची देयके काढली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
..............
महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचंगे यांनी शहरातील सर्व तलावांच्या ठिकाणी पाहणी करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. अहवालानुसार सुरक्षाविषयक दुरुस्ती व आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
................
याआधीच्या अपघाती घटना

९ सप्टेंबर २०२५ : नालासोपारा (पू.) आचोळे तलावात ७० वर्षीय दृष्टिहीन वृद्धाचा सुरक्षा जाळी तुटल्याने मृत्यू.

२६ नोव्हेंबर २०२५ : विरार फुलपाडा येथील तलावात सुरक्षा जाळी तुटून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar PM Awas Yojana: ९४ कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार; फुलंब्रीत आवास योजनेची मंजुरी पत्रे वाटप; कच्च्या घरातून पक्क्या घराकडे वाटचाल; फुलंब्रीत लाभार्थ्यांना दिलासा

Paithan Toilet Vandalism: ७० लाखांची स्वच्छतागृहे बंदच; पैठणमध्ये तोडफोडीने नागरिक संतप्त; उद्‍घाटनाआधीच स्वच्छतागृहांची मोडतोड

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

SCROLL FOR NEXT