मुंबई

भारतीय संविधान'' हा ''दागिना'' वाचवा - प्रा. अँड. जयमंगल धनराज

CD

भारतीय संविधान हा दागिना वाचवा ः जयमंगल धनराज
बौद्ध समाज सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने महात्मा फुले यांचा स्मृतिदिन साजरा
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : बौद्ध समाज सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने संविधान दिन आणि महात्मा फुले स्मृतिदिन डॉ. आंबेडकर भवन येथे रविवारी (ता. ३०) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. घनशाम गायकवाड होते. तर प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य जयमंगल धनराज होते. यावेळी डॉ. विकास जाधव यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.
संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाले असून ही ऐतिहासिक बाब आहे. भारतीय संविधान हा दागिना असून तो वाचला पाहिजे. संविधानाचा दागिना वाचवला तरच ही रेलचल पुढच्या पिढीला देखील आनंदाने उपभोगता येईल. ही आपली जबाबदारी आहे. आपल्या सर्वांसाठी संविधान आधार आणि रक्षक आहे. ते वाचलं पाहिजे, असे जयमंगल धनराज यांनी सांगितले.
यावेळी संविधान व डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर मिलिंद जाधव, अक्षय भोईर यांनी कविता सादर केल्या. तर, प्रेम जाधव लिखित एकपात्री नाटकाचे सादरीकरण सुवर्णा जाधव यांनी केले. तर रजनी कांबळे, प्रकाश सावंत यांनी गाणी सादर केली. यावेळी बौद्ध समाज सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. घनश्याम गायकवाड, सरचिटणीस मधुकर साळुंखे, खजिनदार सदानंद गायकवाड, चिटणीस वसंत कदम, चंद्रकांत बाविस्कर, सदस्य डॉ. भगवान प्रधान, भगवान नरवाडे, ए. आर. कांबळे, ॲड. मनोहर केदारे, सुनीता साळुके, शैलेश दोंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT