मुंबई

खावडा वीजवाहिनीबाधित शेतकऱ्यांना १२ हजार रुपये प्रती चौरस मीटर दर देण्याची मागणी

CD

खावडा वीजवाहिनीबाधित शेतकरी न्यायालयात जाणार?
''वापर हक्क कायदा'' लागू करण्याची मागणी
पडघा, ता. २ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील खावडा वीजवाहिनी प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनी तीन हजार ३०० रुपयांऐवजी आता १२ हजार रुपये प्रति चौरस मीटर नुकसानभरपाईचा एकसमान दर देण्याची मागणी केली आहे. ‘ठाणे जिल्हा विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समिती’ने मंगळवारी (ता. २) कुरुंद येथे पत्रकार परिषदेत ही मागणी केली. या वेळी परिसरातील प्रकल्पग्रस्त बाधित शेतकरी उपस्थित होते.
अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होत असल्याने दोन टॉवरमधील तारेचा कॉरिडॉरचा नुकसानभरपाईचा दर एकसमान असावा. तसेच गॅस, तेल लाइन आणि वीजवाहिनी यांसारख्या प्रकल्पांसाठी वापर हक्क कायद्याचा योग्य वापर व्हावा, अशा समितीच्या मुख्य मागण्या आहेत. समितीचे मुख्य समन्वयक राजन गांवड यांनी सांगितले, की लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून बैठकांचे अहवालही शासनापर्यंत पोहोचवले जात नाहीत.
दरम्‍यान, खावडा वीजवाहिनीच्या प्रश्नासह यापूर्वीच्या प्रकल्पांची माहिती घेऊन समिती आता न्याय मिळवण्यासाठी लढा उभारणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास न्यायिक लढ्यासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारण्याचा तसेच सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

Kannad News : कन्नडमध्ये अखेर युतीचं सुत जुळलं; सुप्रिया घुगे सभापती तर माया सुराशे उपसभापती

Horoscope : मिथुन राशीत गुरु मार्गी गोचर; 11 मार्चपासून धनुसह 'या' 5 राशींसाठी शुभलाभ संयोग, धनलाभ, कामात यश अन् जीवनात मोठा बदल

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

SCROLL FOR NEXT