विवाह सोहळ्यांमुळे वऱ्हाडी मंडळींचा गोंधळ
एकाच दिवशी दोन ते तीन ठिकाणी उपस्थितीचे आव्हान
विरार, ता. २ (बातमीदार) : ‘आली लग्न घटी समीप’, ‘शुभ मंगल सावधान’ अशा मंगलाष्टकाच्या ललकाऱ्या यंदा कमी ऐकू येणार आहेत. यंदा विवाह सोहळ्यांसाठी मर्यादित मुहूर्त असल्याने, तसेच चांगले मुहूर्त असल्यामुळे बहुतांश ठिकाणी एकच तारीख विवाह सोहळ्यांसाठी निश्चित करण्यात आली आहे. सध्या वसई, मिरा-भाईंदर, पालघर या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात विवाहसोहळे आयोजित करण्यात आले आहेत. ते एकाच दिवशी आल्याने ठिकठिकाणी वऱ्हाडी मंडळींचा चांगलाच गोंधळ उडू लागला आहे.
यावर्षी साधारणतः नोव्हेंबरमध्येच विवाह सोहळ्याचा बार उडाला आहे. आधी जमलेले विवाह या गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले. मर्यादित मुहूर्त आणि जास्त विवाह सोहळे आयोजित करण्यात आले असल्याने नागरिकांचा पुरता गोंधळ उडू लागला आहे. आता चालू डिसेंबरमध्येदेखील वसईत आगरी, कोळी, कुणबी समाजात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे या मर्यादित मुहूर्तावर आयोजित करण्यात आल्याने नागरिकांचा गोंधळ उडू लागला आहे. तसेच विवाहासाठी अत्यंत चांगले मुहूर्त या महिन्यात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यांना एकाच वेळी अनेक ठिकाणी हजेरी लावणे, खराब रस्ते व सुरू असलेली विकासकामे, तसेच उद्भवणारी वाहतूक कोंडी, तसेच लांबवरचे लग्न यामुळे वऱ्हाडी मंडळींचा अक्षरशः गोंधळ उडत आहे.
चालू डिसेंबरमध्ये सर्वाधिक विवाह सोहळे आयोजित केल्यामुळे या मंडळींना एका महिन्यात मोठा गोंधळ सहन करावा लागणार आहे. एकाच वेळी अनेक विवाह सोहळ्यांना हजेरी लावण्यासाठी या मंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ठराविक वेळेत खराब रस्त्यांमुळे कसे पोहोचायचे हा एकच प्रश्न लोकांना सध्या भेडसावत आहे.
खराब रस्त्यांचा फटका
एकाच ठिकाणी दोन ते तीन विवाह सोहळे असल्यामुळे हजेरी लावणे बऱ्याच वऱ्हाडी मंडळींना आव्हानात्मक ठरत आहे. त्यात खराब रस्ते असल्यामुळे एकाच वेळी अनेक सोहळ्यांना हजेरी लावण्यासाठी या मंडळींना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आयोजकांचीही तारांबळ
सध्या विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे इच्छित विवाह मुहूर्तावर नवरदेवाला पोहोचवण्यासाठी आयोजकांची देखील तारांबळ उडत आहे. एकूणच, विवाहाचे यावर्षीचे गणित बिघडणार आहे. ग्रामीण, तसेच शहरी भागात एकाच वेळी रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे, तसेच इतर विकासकामे हळूहळू सुरू असल्यामुळे विवाह सोहळ्यांना हजेरी लावण्यासाठी वऱ्हाडी मंडळींना दोन ते अडीच तास आधीच घरातून निघावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.