मतदानाचा निर्विघ्न सोहळा
उरणमधील उमेदवारांचे भवितव्य बंद
उरण, ता.२ (वार्ताहर)ः उरण नगरपरिषदेच्या एका नगराध्यक्षसह २१ नगरसेवकसाठीची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. मोरापासून ते आनंद नगर, कोट नाक्यापासून ते कुंभारवाडा अशा १० प्रभागातील २९ मतदान केंद्रावर मतदान पार पडले.
मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. मतदारांमध्ये मतदानाची उत्सुकता होती. त्यामध्ये नवमतदारांची संख्या अधिक होती. यामध्ये अनेक युवक आणि युवतीने मतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावला आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होते. मतदानाची ही प्रकिया पार पडत असताना सकाळच्या सत्रात ११ च्या सुमारास प्रभाग क्रमांक एकमधील मोरा येथील न्यू इंग्लिश स्कुलमधील मतदान केंद्रावर वाद झाला. महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी निवडणूक प्रकियेचा भंग केल्याचा आक्षेप भाजपच्या उमेदवारांनी घेतल्याने तणावाचे वातावरण होते.
-----------------------------------
चोख बंदोबस्त
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, याकरिता प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. अपंग, वयोवृद्धासाठी रिक्षा, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. प्रक्रियेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असल्याची माहिती निवडणूक अधिकारी डॉ. उद्धव कदम यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.