अंबरनाथमध्ये भरदिवसा घरफोडी
अंबरनाथ, ता. २ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये भरदिवसा घरफोडीची एक मोठी घटना घडली आहे. चोरट्यांनी कानसई सेक्शनमधील सेवा अपार्टमेंटमधील एका बंद घराचे कुलूप तोडून तब्बल तीन लाख ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.
व्यावसायिक भरत धरमसिंग चोथानी (वय ४९) यांच्या घरी सोमवारी (ता. १) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. भरत चोथानी यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.