मुंबई

माथेरानमध्ये मतदानादरम्यान पाच लाखांची रोकड जप्त

CD

माथेरानमध्ये पाच लाखांची रक्कम जप्त
मतदानाच्या दिवशी घटना; एक जण ताब्यात
कर्जत, ता. २ (बातमीदार) ः माथेरान गिरीस्थान नगरपालिकेसाठी मंगळवारी (ता. २) मतदान झाले. या वेळी सकाळी माथेरानमधील वनट्रील परिसरात एका तरुणाच्या पिशवीत पाच लाख रुपये आढळले. दक्षता पथकाने ही रक्कम जप्त करून ट्रेझरीमध्ये जमा केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत प्रकाश राजेंद्र गुप्ता (वय ४०, रा. माथेरान) याला ताब्यात घेण्यात आले. तो एका हॉटेलमध्ये काम करत असून, कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी ही रक्कम घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले आहे, मात्र पथकाने चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष न काढता रक्कम जप्त केली आहे.

संशयानंतर कारवाई
स्थानिक नागरिकाच्या संशयानंतर ही कारवाई झाली. संबंधित तरुण हातात पिशवी घेऊन परिसरात संशयास्पद हालचाल करत असल्याचे दिसले. त्याला थांबवून चौकशी करण्यात आली. पिशवी उघडताच आत पाच लाखांची रोकड होती. तत्काळ पोलिसांना कळवण्यात आले आणि पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तरुणाची कसून चाैकशी केली. परिसरात तपास करताना एका हॉटेलजवळ काही पावत्याही सापडल्या असून, त्या रकमेचा स्रोत, उद्देश आणि मालक कोण याबाबत अद्याप स्पष्टता नाही. संशयिताने पैशांबाबत ठोस माहिती देण्यास सुरुवातीस नकार दिल्याने तपास आणखी कडक करण्यात आला आहे.

यंत्रणा सतर्क
पोलिसांनी रोकड जप्त करून प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी अधीक्षक कार्यालयाकडे पाठवले आहे. निवडणूक काळात इतकी मोठी रक्कम फिरत असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या पैशांचा खरा हेतू काय? ते कुठून आले? आणि कोणाच्या सांगण्यावरून नेले जात होते? याबाबतची माहिती तपासात लवकरच समोर येणार आहे. मतदानाच्या दिवशी मिळालेली ही मोठी रक्कम संपूर्ण माथेरान परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT