मुंबई

येणार तर आम्हीच !

CD

येणार तर आम्हीच!
बदलापुरात मतदानाचा वाढता आलेख; सर्व पक्षांचा आत्मविश्वास वाढला

बदलापूर, ता. २ (बातमीदार) : कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या ४३ जागांसाठी झालेल्या मतदानाला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासून मतदान केंद्रांबाहेर लांबलचक रांगा दिसत होत्या. पाच वर्षांच्या अंतरानंतर होत असलेल्या निवडणुकीबद्दल मतदारांची उत्सुकता आणि सहभाग दोन्हीही प्रचंड होते. मतदारांच्या वाढत्या ओढीमुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असल्याचे पाहायला मिळाले. मतदानादरम्यान सर्वच पक्षांतून ‘येणार तर आम्हीच’ असा सूर जोरदार ऐकू येत होता. उमेदवारांच्या आत्मविश्वासाला मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद अधिक बळ देत असल्याचे दिसून आले.

दहा वर्षांनंतर इतक्या उत्साहात होत असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, हे जाणून घेण्यासाठी आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, कोणाचा नगराध्यक्ष बसणार आणि कोणत्या आघाड्यांची पुनर्बांधणी होणार हे सर्व निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार असले तरी वाढत्या मतदानाने प्रत्येक पक्षाला आपल्या विजयाचा ठाम विश्वास मिळाल्याचे चित्र आज दिवसभर दिसून आले.

नव्या समीकरणांना वाट
२०१५च्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने अटीतटीच्या लढतीनंतर मिळून सत्ता स्थापन केली होती; मात्र कोरोनाकाळामुळे २०२० च्या निवडणुका रखडल्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी यंदा नव्या समीकरणांना वाट मोकळी करणार आहे. गेल्या १५ दिवसांतील भव्य रॅली, घराघरातील प्रचार आणि राज्यातील प्रमुख नेत्यांच्या झालेल्या सभा यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचे तापमान वाढल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखांनी दिली.


बदलापूरकरांनी यंदा मतदानाला तुफान प्रतिसाद दिला. दुपारनंतर मतदानाचा टक्का आणखी वाढत असल्यामुळे यापूर्वी इतिहासाची नोंद घेतली तर शेवटच्या टप्प्यात वाढणारे मतदान हे भाजपच्या पथ्यावर पडते. त्यामुळे नगराध्यक्ष पद हे भाजपाचे निवडून येणार आणि नगरसेवकसुद्धा भाजपाचेच येणार आहेत. सत्ता येणार या विश्वासाने आम्ही समाधानी आहोत.
- राजेंद्र घोरपडे, भाजपा गटनेता

पॅनेल पद्धतीचा गोंधळ असूनही मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदारांचा विश्वास आणि मतदारांचा कौल हा भाजपा-राष्ट्रवादी युतीला असून, कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर भाजपाचा नगराध्यक्ष व भाजपा-राष्ट्रवादी युतीची सत्ता येणार, हे शंभर टक्के निश्चित आहे.
- आशीष दामले, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट

यंदाचे मतदान हे आर्थिक गणितावर झालेले आहे. आमची आर्थिक कुवत नसतानाही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संपूर्ण महाविकास आघाडीच्या बाजूने मतदार कौल देतील, या विश्वासाने आम्ही या मतदानाला सामोरे गेलो. मात्र सत्तेत असलेल्या पक्षांनी आर्थिक बाजार मांडून मतदारांना भुलवले आणि मतदान आपल्या बाजूने केले, असे चित्र दिसत आहे. आमच्या दोन ते तीन जागा तरी निवडून येतील, अशी आशा आम्हाला वाटत आहे.
- किशोर पाटील, शहरप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News: रस्त्याचे काम... तासभर जागेवरच थांब! पिंपरी ‘एमआयडीसी’ परिसरात वाहतूक कोंडी; प्रशासनाच्या नियोजनावर संताप..

Solapur Sugarcane payment: साेलापूर जिल्ह्यात ११०० कोटींची ऊसबिले थकली; शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले तीन हजार ४७६ कोटी, तीव्र संताप व्यक्त!

Gautam Gambhir: स्वत:साठी नव्हे, करंडकासाठीच खेळा! विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय संघासाठी मंत्र

Latest Marathi News Live Update : शेतकरी कुटुंबातील लग्नाला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी सोनीपतमध्ये दाखल

Pune Health Crisis: पुण्यात तरुणाईवर अदृश्य संकट! ७५ हजारांना बीपी, ४४ हजारांना मधुमेह; जीवनशैलीचे आजार वेगाने पसरतायत

SCROLL FOR NEXT