मुंबई

मतदानासाठी उत्साही वातावरण

CD

पालघर, ता. २ : जिल्ह्यातील पालघर, वाडा, जव्हार नगर परिषदांसह वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी आज (ता. २) मतदान पार पडले. चार नगराध्यक्ष आणि ३१९ नगरसेवकपदांच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदारांनी मतदान यंत्रात बंद केले. सर्व उमेदवारांमध्ये धावपळ आणि धाकधूक होती. जिल्ह्यात मतदानादरम्यान कुठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. मतदानानंतर उमेदवारांच्या चेहऱ्यावर ‘कही खुशी, कही गम’ दिसून आला.

पालघर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सोमवार (ता. १)पर्यंत जिल्ह्यात राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले होते. मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असली तरी पहिल्या दोन ते तीन तासांत मतदानाची टक्केवारी खूप कमी होती. दुपारच्या ३ वाजेपर्यंतच्या सत्रात सर्वत्र ३५ ते ४५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदान केंद्रांवर रांगा वाढू लागल्या.

नवमतदारांमध्ये उत्साह
निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. पुरुष मतदारांपेक्षा मतदानासाठी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक केंद्रांवर महिलांच्या रांगा मोठ्या प्रमाणात दिसल्या. ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत पोहोचत मतदानाचा हक्क बजावला.

सात जागांसाठी मतदान बाकी
पालघर हद्दीतील प्रभाग क्रमांक एक आणि वाडा येथील प्रभाग क्रमांक १२ येथे निवडणूक पुढे ढकलल्याने या प्रभागांत सात नगरसेवकपदासाठी मतदान झाले नाही, मात्र येथे नगराध्यक्षपदासाठी उत्स्फूर्त मतदान झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रशासनाकडून बंदोबस्त
मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क होते. सर्वत्र मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडेकोट होती. जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी विशेष पथकांमार्फत सीसीटीव्ही देखरेख, सुरक्षा पथकांची गस्त आणि वेबकास्टिंगद्वारे सतत निरीक्षण केले जात होते.

पक्षीय बूथवर गर्दी
मतदान केंद्राच्या शंभर दोनशे मीटराबाहेर असलेल्या पक्षीय बूथवर प्रत्येक पक्षांचे कार्यकर्ते जीव तोडून मेहनत करत होते. मतदाराचे नाव शोधण्यापासून ते मतपत्रिका देण्याची कसरत आणि त्यांना केंद्रापर्यंत नेण्यासाठी खटाटोप दिसून आली. सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार मतदान केंद्रांवर स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसले.

मतमोजणीकडे लक्ष
नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, अशी विनंती उमेदवारांकडून करण्यात आली. प्रचारबंदी असूनही काही ठिकाणी समर्थकांचा उत्साह कायम दिसला. जिल्ह्यात सर्वत्र मतदान पार पडले असले तरी या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याची गणिते २१ डिसेंबर रोजीच्या मतमोजणीच्या दिवशी उघड होणार आहेत.

शिवसेना-भाजपमध्ये हमरी-तुमरी
डहाणू नगर परिषदेमधील सेंट मेरीज मतदान केंद्रावर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा राडा झाला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुबार मतदारांचा मतदानाचा प्रश्न कायम होता. काही ठिकाणी यादीतील दुबार मतदारांना मतदानाच्या हक्कापासून थांबवण्यात आल्याचे दिसले. दुबार मतदारांनी दोनदा मतदान केल्याचे आरोप पालघरच्या पूर्वेकडील मतदान केंद्रावर झाले. पालघरमध्ये एका प्रभागात शिवसेना-भाजपमध्ये हमरी-तुमरी झाली. पालघरच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये मतदान केंद्रातील मतदान यंत्र १० ते १५ मिनिटे बंद होते. ते पूर्ववत केल्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात झाली.

रिंगणात असलेले उमेदवार
पालघर : ११६
डहाणू : ६५
जव्हार : ७२
वाडा : ६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

एकदाचं ठरलं! पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती १२ मार्चला तर १८ मार्चला ठरणार झेडपीचे अध्यक्ष; हात उंचावून सदस्य करणार मतदान, वाचा...

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT