मुंबई

दुपारनंतर मतदानासाठी रांगा

CD

पालघर, ता. २ (बातमीदार) : नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज (ता. २) सकाळच्या पहिल्या दोन तासांत दहा टक्के मतदान होते. ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी ४४.२२ टक्के मतदान झाले होते, मात्र चार वाजल्यानंतर काही मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. हे मतदान रात्री आठ वाजेपर्यंत चालेल, असे दिसून येत आहे. सरासरी मतदान ७० टक्के होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पालघर शहराच्या मध्य भागात मतदारांमध्ये उत्साह कमी दिसून आला असून पालघरच्या पूर्व भाग व पश्चिमेकडील ग्रामीण भागात मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. हे अखेरच्या वेळी वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडते, कमळ फुलते की धनुष्यबाण भगवा फडकतो, हे आता २१ डिसेंबरला मतमोजणीवेळी समजणार आहे.

पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीचा सकाळच्या वेळी मुंबईकडे व गुजरातकडे जाणारे कर्मचारी यांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत उन्हामुळे मतदानाचा उत्साह दिसून येत नव्हता, मात्र चार वाजल्यानंतर टेंभोडे प्रभाग ८ येथील मतदान केंद्रात मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. साडेपाच वाजले तरी त्या रांगेमध्ये फारसा फरक पडले नव्हता. साडेपाचनंतर मतदान बंद झाल्यानंतर मैदानातील दरवाजे बंद करण्यात आले तरीही मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या. त्यामुळे हे मतदान रात्री आठ वाजेपर्यंत चालेल, असा अंदाज आहे. तसेच प्रभाग क्रमांक दोन वेऊर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर ही मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. येथेही रात्री आठ वाजेपर्यंत मतदान चालेल, असा अंदाज दिसत आहे.

पैशाच्या पावसाची चर्चा
एकंदरीत मतदान शांततेने, कोणतीही अनुचित प्रकार घडलेला नाही, मात्र सोमवारी (ता. १) रात्री पालघरमध्ये काही प्रभागात पैशाचा पाऊस पडला, अशा चर्चा रंगल्या. एका घरामध्ये पाच ते दहा हजार रुपयांप्रमाणे पाकीट वाटप केल्याची चर्चा काही प्रभागांमधून दिसून येत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट, वातावरण कसं राहणार? हवामान तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबईला ये... नाना पाटेकरांमुळे इंडस्ट्रीमध्ये आले मकरंद अनासपुरे; जुनी आठवण सांगत म्हणाले- त्या दिवशी...

Suryakumar Yadav: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी MS Dhoni ला कॉल; सूर्याने सांगितला, 'कॅप्टन कूल'चा सल्ला कसा कामी आला

Mumbai Hotels Closed: मुंबईतील सर्व हॉटेल्स बंद होणार? गॅस तुटवड्यामुळे मोठा फटका, २० टक्के हॉटेल्सना टाळे

शार्दूलची तिसरी पत्नी झाल्यामुळे तुझ्यावर टीका झाली... नेहा पेंडसे थेट उत्तर देत म्हणाली- काही लोकांना वाटतं की...

SCROLL FOR NEXT