दीड वर्षात ९३७ कर्मचारी-अधिकाऱ्यांना पदोन्नती
प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने समाधानाचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदोन्नती मार्गी लागल्याने अधिकारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. अवघ्या दीड वर्षात तब्बल ९३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या पदोन्नती, आश्वासित प्रगती, अुकंपा आणि लाड-पागे वारसा हक्क महापालिकेने सोडवले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्याकरीता विशेष समिती गठीत केली होती.
मार्च २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या पावणे दोन वर्षांच्या कालावधीत ३७८ अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. याद्वारे बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या पदोन्नती विषयाला गती मिळाली आहे. या मोठ्या प्रमाणात झालेल्या पदोन्नतीमुळे वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. पदोन्नतीत गट ‘अ’ मधील ४२, गट ‘ब’ मधील १२२, गट ‘क’ मधील २१४ अशा एकूण ३७८ अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. मार्च २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ५१५ इतक्या मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. यामध्ये गट ‘अ’ मधील ४८, गट ‘ब’ मधील ७, गट ‘क’ मधील ३८९ आणि गट ‘ड’ मधील ७१ अशा एकूण ५१५ अधिकारी, कर्मचारी यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. यामुळे पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या अधिकारी, कर्मचारीवृंदाला दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवर गट ‘अ’ ते गट ‘ड’ या संवर्गात शिक्षक वगळता एकूण ४१२४ पदांच्या विभागनिहाय आकृतीबंधाला शासनामार्फत मंजूरी मिळाली आहे. त्यापैकी २,२६६ पदे भरलेली आहेत. महापालिकेच्या सर्व संवर्गाचे सेवाप्रवेश नियमही मंजूर आहेत. महापालिकेच्या कामकाजात भासणारी अधिकारी, कर्मचारी यांची गरज लक्षात घेऊन सरळसेवा पदभरती काढण्यात आली असून गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गाच्या ६६८ पदांची पदभरती अंतिम टप्प्यात आहे. यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.
------------------------------------------
मार्च २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अनुकंपा तत्वावर ३३ उमेदवारांना महापालिका सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार गट क संवर्गातील लिपीक-टंकलेखक, वायरमन, कनिष्ठ अभियंता अशा पदांवर ९ तर शिपाई, कक्षसेवक अशा पदांवर २४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच शासनाच्या धोरणानुसार शिपाई / सफाई कामगार पदावर ३ बारवी प्रकल्पग्रस्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. लाड-पागे समितीच्या वारसा हक्क शिफारसीनुसार गट क संवर्गात एका उमेदवारास रोखपाल पदावर व गट ड संवर्गात ११ उमेदवारांना सफाई कामगार पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.