मुंबई

टिळक नगर एसआरव्ही रुग्णालयासमोरील कच-याने नागरिक त्रस्त

CD

टिळकनगर एसआरव्ही रुग्णालयासमोर कचरा
चेंबूर, ता. २ (बातमीदार) ः टिळकनगर येथील एसआरव्ही रुग्णालयासमोरील मार्गावर साचलेल्‍या कचऱ्यामुळे नागरिक त्रस्‍त झाले आहेत. पालिकेकडून येथील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कुर्ला टर्मिनस, बुद्ध विहार व रुग्णालय या मार्गावर आहे. त्यामुळे या मार्गावर सतत रहदारी असते. पालिकेतर्फे कचऱ्याचा लोखंडी डबा ठेवण्यात आलेला आहे; मात्र हा कचऱ्याचा डबा लोकसंख्येनुसार अपुरा पडत आहे. त्यामुळे डबा भरला की, कचरा बाहेर पडतो. पालिकेचे कामगार या मार्गावरील कचरा उचलतात; मात्र मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असल्‍याने लगेच कचऱ्याचा डबा भरतो. त्यामुळे या मार्गावर कचरा पसरून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. पालिकेने लहान कचऱ्याच्या डब्‍याऐवजी मोठा कचऱ्याचा डबा ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT