बदलापूरमध्ये ६० टक्के मतदान
४३ जागांसाठी निवडणूक; २१ डिसेंबरला निकाल
बदलापूर, ता. २ (बातमीदार) ः कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या १० वर्षांनी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने सहभाग घेतला. दिवसभरात ६० टक्के मतदान झाले. २०१५मधील ५२ टक्क्यांच्या तुलनेत यंदाचे मतदान लक्षणीय वाढले. सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. या वाढत्या मतदानामुळे प्रशासन आणि राजकीय पक्षांकडून बदलापूरकरांचे कौतुक होत आहे.
पालिकेच्या एकूण ४९ जागांपैकी सहा जागांवर स्थगिती असल्यामुळे मंगळवारी (ता. २) ४३ जागांवर मतदान झाले. या ४३ प्रभागांमधील उमेदवारांचे भविष्य आता मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. या निकालासाठी २१ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.