मुंबई

मुंबईत मराठी माणसांची गळचेपी होऊ देणार नाही!

CD

मुंबईत मराठी माणसांची गळचेपी होऊ देणार नाही!
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सकाळ’च्या कार्यालयाचे उद्‍घाटन

मुंबई, ता. २ : मुंबई ही कायमच मराठी माणसांची आहे. ती मराठीच राहणार आहे. तिचे मराठीपण कोणी घालवू शकत नाही. यामुळे मुंबईमध्ये मराठी माणसांची गळचेपी कोणीच करू शकत नाही आणि ती आम्ही कधी होऊही देणार नाही, असे ठाम आश्वासन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘सकाळ’च्या मुंबईतील प्रभादेवी येथील नवीन कार्यालयाचे आज उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह ‘सकाळ माध्यम समूहा’च्या संचालक जान्हवी पवार, ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक नीलेश खरे, मुंबई युनिट हेड सुभाष जयस्वाल आदी उपस्थित होते. ‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली. त्या वेळी त्यांनी राजकारणासह राज्यातील विविध प्रश्न, मुंबईतील प्रश्नांवर मोकळेपणे उत्तरे दिली. मुख्यमंत्री म्हणाले, की मुंबईमध्ये हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. देशभरातून लोक इथे आले आहेत. ते वेगवेगळी भाषा बोलणारे असतात, विविध सामाजांचे असतात; पण मुंबई ही कायमच मराठी माणसांचीच राहणार आहे. तिचे मराठीपण कोणी घालवू शकत नाही. मध्यंतरी पुनर्विकासाच्या धोरणांनी मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जायला भाग पाडले; पण आता आपण जी धोरणे आणलेली आहेत, त्यामुळे मराठी माणसाला मुंबईमध्येच घर मिळून त्याचे येथेच पुनर्वसन होत आहे. त्यामुळे आता मराठी लोकसंख्या इथून पुढे कमी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
विविध भाषिक वादांवर ते म्हणाले, की मुंबईत कधी कधी मराठी-हिंदी संघर्ष तयार होतात. पूर्वी मराठी-साऊथ इंडियन व्हायचे. पण हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवले जातात तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीत. मुंबईच्या संस्कृतीमध्ये सगळे लोक गुण्यागोविंदाने नांदणारे आहेत. मराठी माणसाचा गणेशोत्सव अख्खी मुंबई साजरा करते. दांडिया गुजराती असून मराठी माणूस साजरा करतो. पण आपली मराठी अस्मिता, मराठीपण, संस्कृती, भाषा जपली पाहिजे. त्या जपल्या नाहीत तर क्षीण होत जातात. त्यामुळे त्या टिकवण्यासाठी आग्रही राहायला पाहिजे. तो आग्रह आम्ही ठेवलेला असून तो कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
...
इंग्रजीला पायघड्या या वृत्तीला विरोध
आपण अजून एक भारतीय भाषा जर शिकलो तर त्यातून आपले व्यक्तिमत्त्व अधिक विकसित होईल. जगभरामध्ये आपले सॉफ्टवेअर इंजिनिअर जातात. त्यांना इंग्रजी भाषा येते. इंग्रजी भाषा आली तर त्यांना सगळीकडे जाता येते. वेगवेगळ्या भाषा आल्या तर त्याचा फायदा होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदी भाषेसंदर्भात आग्रह धरला होता. हिंदी भाषा शिकली पाहिजे. मला खंत वाटते, की काही जण भारतीय भाषेला विरोध करतात आणि इंग्रजीला पायघड्या घालतात. आपल्याच भारतीय भाषांना इतका टोकाचा विरोध करायचा, जसे की ही पाकिस्तानची भाषा आहे आणि इंग्रजीला मात्र पायघड्या घालायच्या या वृत्तीला माझा विरोध आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
...
आमच्यात संघर्ष नाहीत!
एकनाथ शिंदे आणि आमच्यात संघर्ष वगैरे नाहीत. आपल्या घरामध्येही दोन भावांचे प्रत्येक गोष्टीत एकमत नसते. दोन्हीही भांडत असतात. तसे काही गोष्टींवर आमचे एकमत नाही. सगळ्या गोष्टींत एकमत झाले असते तर आम्ही वेगवेगळ्या पक्षांत कशाला राहिलो असतो? आम्ही तिघेही वेगवेगळे पक्ष आहोत. आमची काही मतमतांतरे आहेत; पण व्यापक मुद्द्यांवर आम्ही एकत्रित आहोत आणि एकत्रित राहणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
...
२०२९नंतर पक्ष ठरवेल ती जबाबदारी!
एक अनुभवी मुख्यमंत्री म्हणून मी या पदावर बसलेलो आहे. प्रशासन आतून-बाहेरून बघितलेले आहे. अडचणींची कल्पना आहे. या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला कसा देता येईल, हा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे २०२९पर्यंत जो काही कालावधी मला दिलेला आहे, त्यात पूर्ण क्षमतेने काम करायचे, हा माझा प्रयत्न आहे. २०२९नंतर पक्ष ठरवेल ती जबाबदारी घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

भररस्त्यात प्रसिद्ध अभिनेत्रीला मारली कानशिलात, सोशल मीडियावर Viral Video

Thane News: मेट्रो प्रकल्पासाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड, प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

Latest Marathi News Live Update : व्यावसायिक गॅस टंचाई; हॉटेलचालकांना लाकडाच्या भट्टीवर स्वयंपाक करण्याची वेळ

SCROLL FOR NEXT