मुंबई

तर एकही विमान उडू देणार नाही

CD

...तर एकही विमान उडू देणार नाही
खासदार सुरेश म्हात्रे; नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाची मागणी
भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी संघर्ष तीव्र होणार आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेले आश्वासन अद्याप पाळलेले नाही आणि विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही, तर २५ डिसेंबरला या विमानतळावरून एकही विमान उडू अथवा उतरू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी भिवंडी येथे भूमिपुत्र संघटनांच्या बैठकीनंतर दिला.
यापूर्वी विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीसाठी ६ ऑक्टोबरला नियोजित असलेले जनआक्रोश आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले होते. त्या वेळी उद्घाटनानंतर अडीच महिन्यांत नामकरणाचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्याचे राज्य सरकारने सांगितले होते. दरम्यान, उद्घाटन होऊन दोन महिने उलटले असून, २५ डिसेंबरला पहिले उड्डाण होणार असतानाही नामकरणाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे धूळ खात पडला असून, मंत्रिमंडळ बैठकीत तो चर्चेलाही आला नसल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. खा. म्हात्रे यांनी सरकारला इशारा दिला आहे की, समाजाच्या रोषाची वाट न पाहता सरकारने दिलेला शब्द पाळावा अन्यथा संघर्ष अटळ आहे. या वेळी नवी मुंबईसह पाचही जिल्ह्यांतील भूमिपुत्र संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आंदोलनाची घोषणा
केंद्र सरकार जाणीवपूर्वक चालढकल करीत असल्याचा आरोप करीत खा. म्हात्रे यांनी २० दिवस वाट पाहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर २२ डिसेंबरला मानकोली येथून पायी जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात होईल. २४ डिसेंबरला आंदोलक नवी मुंबई विमानतळ येथे दाखल होतील आणि २५ डिसेंबरला पहिले उड्डाण रोखले जाईल, असा इशारा खा. सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

SCROLL FOR NEXT