निवडणूक स्थगितीमुळे ज्येष्ठ नागरिक नाराज
कानसई आणि साई विभागात बैठक
अंबरनाथ ता. २ (वार्ताहर) : कानसई आणि साई विभाग ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांशी विविध महत्त्वाच्या विषयांवर मुक्त संवाद साधण्यात आला. विशेषतः, अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयाबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच दैनंदिन जीवनातील अडचणी व समस्या स्पष्टपणे मांडल्या.
नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली होती, अनेक अनुभवी आणि ज्येष्ठ नागरिकांनीदेखील प्रत्यक्ष फिल्डवर तसेच कार्यालयांत दिवसरात्र काम केले होते. अनेक जणांनी निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन त्यांच्या घरातील समारंभ, खासगी कार्यक्रम रद्द केले. आता पुन्हा २० डिसेंबरला निवडणूक यंत्रणा कामाला लागेल आणि पुन्हा मेहनत करावी लागेल; मात्र त्या तारखेला देखील पुढची तारीख मिळू नये, असा तिरकस टोला काही ज्येष्ठ नागरिकांनी लगावला आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे मत अनेकांनी या वेळी नोंदवले.
संवादाच्या या व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सर्व भावना, सूचना आणि प्रश्न लक्षात घेऊन त्यांचा नक्की विचार करण्यात येईल, अशी ग्वाहीही या वेळी माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी दिली.
या बैठकीला माजी नगरसेवक कुणाल भोईर, मोहन पैठणकर, विजय इंगळे, सदानंद माने, संतोष चाळके, सुनील शर्मा, निवृत्ती फालक, नरेंद्र पाटील, रामलाल पाटील आणि संजय कोल्हे उपस्थित होते.
लोकशाहीचा उत्सव
उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले अनुभव आणि अडचणी सर्वांसमोर मोकळेपणाने मांडल्या. लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग अत्यंत मौल्यवान असल्याने, बैठकीत मतदान कसे करावे आणि मतदार म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याची सविस्तर माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.