मुंबई

नव्या रंगमंच सभागृहाचे विस्तारीकरण

CD

भांडुपमधील ‘दिना बामा पाटील रंगमंचा’चा विस्तार
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) : ईशान्य मुंबईतील नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी भांडुप येथील स्व. दिना बामा पाटील रंगमंचाचा विस्तार आणि नूतनीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे भांडुप, कांजूरमार्ग आणि आसपासच्या परिसरातील कलाकारांना सरावासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आधुनिक सोयीसुविधांनी युक्त प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे.
स्थानिक कलाकारांना सरावासाठी मुंबईतील दूरच्या भागांमध्ये जावे लागत होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी आणि सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, म्हणून हा विस्तार करण्यात आला. खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून हे विस्तारीकरण करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते सोमवारी (ता. १) या नूतनीकृत रंगमंचाचा शुभारंभ करण्यात आला. आता हा रंगमंच आधुनिक सोयीसुविधांनी युक्त बहुउद्देशीय स्वरूपात भांडुपकरांच्या सेवेत सज्ज झाला आहे.
या विस्तारामुळे भांडुपमधील नाट्यकलावंत, सांस्कृतिक संस्था आणि कलाप्रेमींना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील कला चळवळीला नवे बळ मिळणार असल्याची भावना येथील कलाकारांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Road Accident : परदेशात फिरण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात नोकरी करणाऱ्या बीडच्या पूजाचा थायलंडमध्ये मृत्यू; दुचाकीवरून फिरताना अपघात

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून मोठ्या रांगा

स्पेशल चहा बंद, फक्त 'कटिंग'; गॅस टंचाईचा चहा टपऱ्यांना फटका, तर कामगारावर बेरोजगारीचं संकट

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

SCROLL FOR NEXT