मुंबई

संदेश विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

CD

संदेश विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात
घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) : ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या विक्रोळी पश्चिम येथील शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुलातील संदेश विद्यालय आणि सनराईज इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात नुकतेच विज्ञान प्रदर्शन उत्साहात झाले. प्रदर्शनाला २,१५० विद्यार्थी आणि ५८५ पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना दाद दिली.
‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम’ या मुख्य विषयाखाली, सामाजिक आणि पर्यावरणाला अनुकूल अशा सात उपविषयांवर आधारित इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले ५० विज्ञान प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले होते.
राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल कोल्हे यांच्या हस्ते, प्राचार्य मेघा म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी संगीत शिक्षक मनोहर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विज्ञानगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी बोरसे यांनी केले.
सनराईज इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका फातिमा टोले, संदेश विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रवीण झोपे व शिक्षक-विद्यार्थ्यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT