मुंबई

कांदवळवन बचाव अभियानाला सुरूवात

CD

कांदवळवन बचाव अभियानाला सुरुवात
माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते चेंबूरमध्ये लागवड
चेंबूर, ता. ३ (बातमीदार) ः मुंबईच्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कांदळवनांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी कांदळवन बचाव अभियान हाती घेतले आहे. या उपक्रमाच्या शुभारंभाला वन विभागातील अधिकारी, छेडा नगर रेसिडेंट असोसिएशनचे पदाधिकारी, स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेंबूर, वाशीनाका परिसराप्रमाणे मानखुर्द, गोवंडी, ट्रॉम्‍बे, विक्रोळी व वडाळा परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण असताना याच परिसरात राजरोजपणे तिवरांची कत्तल केली जात आहे. अतिक्रमण, भराव यांमुळे अडकलेल्या खाडीच्या पाण्याच्या अभावाने या जमिनीवरील खारफुटीला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी आणि वन विभागाच्या सहाय्याने माजी खासदार राहुल शेवाळे यांनी या खारफुटीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेऊन या जागेत सुमारे २००० पेक्षा अधिक खारफुटीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.
भविष्यातही विद्यार्थी, युवक, सामाजिक संस्था आणि स्थानिक भूमिपुत्रांना सोबत घेऊन मुंबईतील कांदळवांनाच्या संरक्षणासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

इतर ठिकाणीही उपक्रम राबवणार
वन विभागाकडून या कांदळवनाचे संरक्षण प्राधान्याने करण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या प्रतिसादानंतर इतर ठिकाणच्या कांदळवनाचेदेखील अशाच पद्धतीने पुनरुज्जीवन करण्यात येईल, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT