मुंबई

विवेक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात

CD

विवेक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाची धूम
घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी घाटकोपर, पार्कसाईट येथील विवेक विद्यालयात नुकतेच शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनात पर्यावरण, सोलार ऊर्जा, प्रदूषण, पर्जन्य, शहरीकरण आणि शेती यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर आधारित एकूण ९० प्रकल्प विद्यार्थ्यांनी मांडले. बाल वैज्ञानिकांनी (विद्यार्थ्यांनी) त्यांच्या प्रकल्पांची माहिती मान्यवर व परीक्षकांना आत्मविश्वासाने दिली आणि विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. आर. आर. एज्युकेशन संस्थेचे संचालक प्रभाकर भोईटे, मल्टीपर्पज टेक्निकल शाळेचे मुख्याध्यापक संतोष भारमळ, अग्रसेन विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक परदेशी, तसेच शाळेच्या सचिव विमल थोरात यांनी प्रदर्शनाला भेट दिली. विभागातील नागरिक आणि विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनीही प्रकल्पांची माहिती घेतली.
शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी असे उपक्रम यापुढेही राबवण्याचे आश्वासन दिले. तसेच पालकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षक आणि इतर शिक्षकांनी उत्तम नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

वाहन नोंदणी-लायसन्सची माहिती आता व्हॉट्सअ‍ॅपवर; परिवहन विभागाची नवी सेवा, २४x७ चॅटबॉट सुरू होणार

Sangli Gas Cylinder : ‘आमचा गॅस सिलिंडर कुणी पळवला?’ ग्राहकांचा संताप एजन्सींचा काळा बाजार, सर्वत्र लागल्या रांगा

Education News : पुढील तीन वर्षांत पहिली ते बारावीचा कायापालट; जाणून घ्या तुमच्या पाल्याच्या इयत्तेचा नंबर कधी?

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

SCROLL FOR NEXT