मुंबई

निवडणूक रद्द करा, अन्यथा न्यायालयात लढा

CD

निवडणूक रद्द करा अन्यथा न्यायालयात लढा
मतदार याद्यांतील गोंधळावर राष्ट्रवादीचा आक्षेप; आयुक्तांकडे तक्रार
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकांपूर्वीच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रारूप मतदार याद्या आणि प्रभागरचनेतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत राष्ट्रवादीने (अजित पवार गट) थेट महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेत निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली आहे. या गंभीर आरोपांमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून नागरिकांनी यादीतील अनेक त्रुटींवर आवाज उठवला आहे. मतदारांच्या नावांमध्ये आणि पत्त्यांमध्ये चुका आहेत. अनेक मतदारांच्या नोंदीमध्ये ओळख पटवण्यासाठी फोटो उपलब्ध नाहीत, एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केली आहेत. या त्रुटींमुळे निवडणुकीची पारदर्शकता आणि निष्पक्षता धोक्यात येत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव सोनिया धामी आणि जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांनी आयुक्तांची भेट घेऊन अधिकृत तक्रार नोंदवली.

मतदार यादी आणि प्रभाग सीमा मुद्दाम फेरफार करून काही विशिष्ट नेते आणि विशिष्ट पक्षाला फायदा मिळेल अशा पद्धतीने बदलण्यात आल्या आहेत. यामध्ये काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आम्हाला संशय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भरत गंगोत्री यांनी केली आहे.

यादीतील गोंधळ आणि संशयास्पद प्रभागरचनेवर आधारित निवडणूक म्हणजे लोकशाहीची थेट हत्या असल्याचे त्यांनी म्हटले. गोंधळ दूर न करता निवडणूक पार पाडल्यास अंबरनाथप्रमाणे गैरव्यवस्था आणि अस्थिरता उल्हासनगरातही निर्माण होण्याचा धोका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT