मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनारूढ स्मारक घणसोलीत उभारण्याची मागणी

CD

घणसोलीत शिवरायांचे सिंहासनारूढ स्मारक उभारावे
मनसेचे संदीप गलुगडे यांची आयुक्तांकडे मागणी

तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबईत नेरूळ वगळता वाशीपासून ऐरोली-दिघापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे एकही स्मारक नाही. शिवजयंती किंवा अन्य उत्सवदिनी महाराजांना वंदन करण्यासाठी नवी मुंबईकरांना नेरूळपर्यंत जावे लागते. त्यामुळे घणसोलीतही छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनारूढ स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी मनसेचे संदीप गलुगडे यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना दिले आहे.
घणसोली सेक्टर ९ येथील संत निरंकारी चौकात नेरूळ सेक्टर २ प्रमाणेच प्रशस्त जागा उपलब्ध असून, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनारूढ भव्य स्मारक उभारावे. त्यामुळे शिवप्रेमींना घणसोलीतच शिवजयंती उत्सव, शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करता येईल.
याप्रसंगी मनसेचे घणसोली विभाग अध्यक्ष विशाल चव्हाण, उपविभाग अध्यक्ष अक्षय नाईक, शाखा अध्यक्ष नीलेश जाधव, उपप्रभाग संघटक धनंजय देवकर, उपशाखा अध्यक्ष प्रतीक कलवले, अजित राऊत, कल्पेश पाटील उपस्थित होते.


शिवजयंतीपूर्वी स्मारक व्हावे!

येत्या शिवजयंतीपूर्वी म्हणजेच १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनारूढ स्मारक उभारावे, अशी मागणी संदीप गलुगडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : लासलगावात टर्फ मैदानावर राडा! भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला

धनंजय मुंडेंना आणखी एका प्रकरणात क्लिन चीट, राज्याच्या लोकायुक्तांनी फेटाळले आरोप

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

SCROLL FOR NEXT