मुंबई

कचरा डबा खरेदीचा प्रस्ताव गुंडाळला

CD

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेचा कोट्यवधींचा कचरा डबा खरेदीचा निर्णय चहुबाजूने टीका झाल्यानंतर अखेर रद्द करण्यात आला आहे. या खरेदीसाठी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेला निधी शहरातील अन्य विकासकामांसाठी वळवण्यात आला आहे.

शहरातील गुहासंकुलांना कचरा संकलनासाठी हे डबे पुरवणार येणार होते. या डब्यांची किंमत ६६ हजार ते साडेनऊ लाखांपर्यंत होती. त्यासाठी तब्बल १९ कोटी खर्च केले जाणार होते व हा निधी राज्य सरकारकडून देण्यात येणार होता, मात्र या कचरा डबा खरेदीवर सर्व बाजूंनी जोरदार टीका करण्यात आली. मुळात कचऱ्याच्या डब्यांची किंमत एवढी कशी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले. दुसरीकडे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना केवळ डबा खरेदीवर कोट्यवधींचा निधी कशासाठी उधळण्यात येत आहे, असा आक्षेप राजकीय पक्ष, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानंतर कचरा डबा खरेदीला आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी स्थगिती दिली व डब्यांच्या खरेदीच्या दराची तपासणी करण्यासाठी आयआयटी या सरकारमान्य संस्थेची नियुक्ती केली.

गृहसंकुलाना दररोजचा गोळा होणारा कचरा संकलित करून ठेवण्यासाठी महापालिकेकडून कचऱ्याचे डबे पुरविण्यात येणार होते. हे डबे वेगवेगळ्या प्रकारचे होते. त्यात स्टेनलेस स्टील पावडर कोटेड, सौर पॅनेल असलेले स्वयंचलित व फायबरच्या डब्यांचा समावेश होता. एकंदर चार हजार डबे खरेदी केले जाणार होते. डबे खरेदी करण्यासाठी शासकीय दर मंजूर नसल्याने प्रशासनाकडून खुल्या बाजारातून दर मागविण्यात आले होते. त्यानंतर या दरानुसार डबे खरेदीची ई-निविदा काढण्यात आली होती.

डब्यांसाठीचे दर योग्य
आयआयटी संस्थेने केलेल्या तपासणीचा प्राथमिक अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. यानुसार स्टील व फायबरच्या डब्यांसाठीचे दर योग्य असल्याचा निर्वाळा दिला असून, सौरऊर्जेवरील कचरा डब्यांच्या दराबाबत मात्र अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली, मात्र आता डब्यांची खरेदीच रद्द झाल्याने आयआयटीच्या अहवालाला फारसे महत्त्व उरलेले नाही.

कचरा डबा खरेदीसाठी मंजूर झालेला निधी राज्य सरकारने अन्य विकासकामांसाठी वळवला आहे. तसे लेखी आदेश नगरविकास विभागाकडून महापालिकेला प्राप्त झाले आहेत.
- दीपक खांबित, शहर अभियंता

डब्याचा प्रकार किंमत
स्टेनलेस स्टील, फायबर ६६ हजार
सौरउर्जेवरील डबा साडेनऊ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT