मुंबई

भूमिपुत्रांची शेत जमीन नावावर करण्यास महसूल अधिकाऱ्यांची दिरंगाई!

CD

शेतजमीन नावावर करण्यास महसूल अधिकाऱ्यांची दिरंगाई!
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ; मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल
कळवा, ता. ३ (बातमीदार) ः स्थानिक शेतकऱ्यांची जमीन उद्योगपतीने औद्योगिकरणासाठी विकत घेऊन त्यावर १५ वर्षे कोणताही कारखाना सुरू केला नसल्यास ती जमीन सरकारने पुन्हा त्या शेतकऱ्यांना मूळ किमतीत परत देण्याचा कायदा आहे. या कामी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांना आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बाळकुम येथे राहणाऱ्या सोनीबाई पाटील यांनी आपली शेतजमीन १९६३ मध्ये राधाकृष्ण रामनारायण प्रा. लिमिटेड यांना औद्योगिक कारणासाठी विकली होती, मात्र कंपनीने आतापर्यंत या जागेवर कोणतीही कंपनी स्थापन केलेली नाही, मात्र शासनाच्या अधिसूचीनुसार औद्योगिक किंवा विशिष्ट प्रयोजनाकरिता संबंधित उद्योजकाने त्या जमिनीवर बांधकाम केले नाही किंवा कंपनी स्थापन केली नाही, तर ती जमीन मूळ मालक शेतकऱ्याला मूळ किमतीत परत देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासमोर सुनावणीसाठी हे प्रकरण आले असता त्यांनी ११ जुलै रोजी तहसीलदार व बाळकुम मंडळ अधिकाऱ्यांना ही जमीन तातडीने शासनाच्या नावे वर्ग करण्याचा आदेश पारित केला होता, मात्र या आदेशाला महसूल विभागाने हरताळ फासला असून, त्याकामी टाळाटाळ केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
जमीन मालक रोहिदास पाटील यांनी महसूल विभागाकडे पत्रव्यवहार करून वारंवार पाठपुरावा केला आहे. तसेच, पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात तक्रार दाखल केली आहे, परंतु अजूनही महसूल अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याने रोहिदास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली आहे.

तहसीलदारांकडे सहीसाठी प्रलंबित
या प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे आदेश पारित झाला असून, हे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे सहीसाठी प्रलंबित आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हे प्रकरण निकाली निघेल, असे बाळकुमचे मंडळ अधिकारी शशिकांत जगताप यांनी सांगितले आहे, तर यासंदर्भात तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ला; भारतीयांच्या मृत्यूने तणाव वाढला, केंद्र सरकारचा इशारा

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT