मुंबई

कमी पटसंख्या असलेल्या शाळा वाचवा - गुलाबराव पाटील

CD

कमी पटसंख्या असलेल्या शाळा वाचवा ः गुलाबराव पाटील
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : राज्य सरकारच्या निर्णयामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या एक हजाराहून अधिक शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे, तर एक हजार नऊशेपेक्षा जास्त शाळा एक-शिक्षकी बनल्या आहेत, परिणामी हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या गंभीर परिस्थितीविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. या संपाला कोकण विभागाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनीही पाठिंबा दिला आहे.
या निर्णयामुळे शिक्षक अतिरिक्त ठरतील, हे राज्य शिक्षक परिषदेने वेळोवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्या वेळी दादा भुसे यांनी विधानसभेत एकही शाळा बंद पडणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात हे आश्वासन हवेत विरल्यामुळे शिक्षकवर्गात संतापाचे वातावरण आहे. याविरोधात राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी तीव्र भूमिका घेतली असून, सरकारला निवेदन देत हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोकण विभागाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी या निर्णयाचे भाषिक शाळांवर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले. या निर्णयामुळे विविध भाषेच्या हजारो शाळा बंद पडत आहेत आणि त्यांना वाचवणे आता अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. १५ मार्चचा शासन निर्णय रद्द करा. शिक्षकांना शिकवू द्या. अन्य कामाला लावू नका. ५ डिसेंबरच्या विविध संघटनांच्या राज्यव्यापी संपात राज्य शिक्षक परिषदेचा सहभाग राहील, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : माहिममधील सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT