मुंबई

बहिणाबाई चौधरींच्या कवितांनी दुमदुमले डोंबिवलीचे उद्यान

CD

बहिणाबाई चौधरींच्या कवितांनी डोंबिवलीकर भारवले
स्मृतीदिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७५ व्या स्मृतिदिनानिमित्त सुनीलनगर येथील बहिणाबाई चौधरी उद्यानात बुधवारी (ता. ३) स्मृतिदिन कार्यक्रम उत्साहात साजरा पार पडला. या उद्यानात व्यायामासाठी नियमित येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सरोजिनी पाटील यांनी बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम सुरू केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्यान व्यायाम समितीचे सदस्य कृष्णा सोमार्डे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश माने यांनी केले. यावेळी ‘बहिणाबाई अमर रहें’, ‘बहिणाबाईंची लेखणी महाराष्ट्राची शान’ अशा घोषणांनी उद्यान परिसर दुमदुमून गेले. दररोज व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या व्हॉट्सॲप समितीच्या माध्यमातून बहिणाबाईंचा जन्मदिन, स्मृतिदिन आणि काही सण साजरे केले जातात.
उद्यान स्वच्छतेसाठी नित्यनेमाने प्लास्टिक कचरा गोळा करणारे केशव करकेरा यांचा दिव्यांग बांधव कोटियन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्यानातील सर्वात ज्येष्ठ सदस्य सरोजिनी पाटील यांचाही व्यायाम समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला समितीचे अनेक सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला व मोठ्या संख्येने व्यायामप्रेमी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, साहित्यप्रेम आणि एकीची भावना जाणवत होती.

जीवनप्रसंग आणि लोकप्रिय कविता सादर
यंदाच्या स्मृतिदिनानिमित्त डोंबिवलीतील हास्यकवयित्री लता पाटील यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी बहिणाबाईंचे जीवनप्रसंग आणि त्यांच्या अनेक लोकप्रिय कविता सादर करून उपस्थितांना भावविभोर केले. त्यांच्या सन्मानार्थ महिला वर्गाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT