मुंबई

बेकायदा, अतिधोकादायक इमारती रडारवर

CD

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. ४ : गेल्या काही वर्षांत वसई परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी राहात आहेत, मात्र तीन महिन्यांपूर्वी इमारत कोसळल्यानंतर शहरातील अनधिकृत, अतिधोकादायक बांधकामांचा प्रश्न समोर आला आहे. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत ३८ लाखांहून अधिक चौरस फूट बांधकामांवर पालिकेने बुलडोझर फिरवला.

२६ ऑगस्ट रोजी रमाबाई इमारत कोसळल्याने १७ जणांचा मृत्यू, तर नऊ जण जखमी झाले. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरले. त्यामुळे वसई-विरार शहरात चाळी, लोडबेरिंग, तसेच अनधिकृत इमारतींचा प्रश्न उपस्थित होत आहे. अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, स्वस्त मिळणारी घरे यामुळे नागरिक आकर्षित होतात आणि त्यानंतर स्वप्नातील घरकूल खरेदी करतात, मात्र निकृष्ट दर्जाचे बांधकाम, नियोजनाचा अभाव, वीज-पाणी समस्या यामुळे रहिवाशांचे हाल होतात. अशा इमारती कोसळून नागरिकांचे बळी जाऊ लागले. अनेक भागात इमारतींचे स्लॅब जीर्णावस्थेत आहेत, कोसळत आहेत, तरी रहिवासी जीव धोक्यात घालून राहतात. त्यामुळे धोकादायक, बेकायदा इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो.

विरार येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह सरकारने प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर आजतागायत कारवाई सुरू ठेवली आहे. इमारत दुर्घटना, जीर्ण इमारती आणि स्थलांतरित करण्यात आलेली धावपळ असे सत्र गेल्या तीन महिन्यांपासून महापालिका क्षेत्रात दिसून येत आहे. शहरात अनधिकृत बांधकामे केली जात असताना त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, मात्र खुलेआम सदनिका विक्री होते. त्यानंतर बांधकाम अनधिकृत असल्याचे समोर येते. त्यामुळे अशी बांधकामे उभी राहात असताना पालिका प्रशासनाची नजर का नसते, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

महापालिकेने कारवाई केल्यावर पुन्हा त्याच भागात बांधकामे उभी राहतात. त्यामुळे प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली जात आहेत. यात वाणिज्य, रहिवासी इमारतींचा समावेश आहे, तर चाळी, गाळेदेखील भुईसपाट केली जात आहेत. अनेक अतिधोकादायक इमारतींना तडे गेले आहेत. त्यांचे स्लॅब कोसळत आहेत व नादुरुस्त इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

लेखापरीक्षणाचा प्रश्न गंभीर
वसई-विरार महापालिका प्रशासन इमारतींना नोटिसा बजावत असली तरी जीव मुठीत ठेवून रहिवासी वास्तव्य करतात. नोटिसीमध्ये इमारत लेखापरीक्षण मुद्दा येतो, मात्र त्याची पडताळणी केली जाते का, हा प्रश्न निर्माण होतो.

तारीख परिसर
५ जुलै नालासोपारा अलंकापुरी येथील साईराज इमारतीला तडा
२६ ऑगस्ट विरार रमाबाई इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू
२ सप्टेंबर नालासोपारा पूर्व परिसरातील धोकादायक इमारतीतील रहिवासी स्थलांतरित
७ सप्टेंबर विरार श्री गणेश इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोघे जखमी

महापालिकेची कारवाई (चौरस फूट)
महिना अनधिकृत बांधकामे अतिधोकादायक
सप्टेंबर ३,१२,८०६ ४,३०,९७८
ऑक्टोबर ६,०३,६११ ७,८३,२३८
नोव्हेंबर ७,०३,७३६ १०,१०,७०८
एकूण १६,२०,१५३ २२,२४,९२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes: जो रूटचं ऑस्ट्रेलियात पहिलंच शतक! ४० व्या सेंच्युरीनंतर खास सेलिब्रेशनही केलं; पण स्टार्कनेही ६ विकेट्ससह मैदान गाजवलं

Sakal Survey: मराठी संवर्धनासाठी महायुती सरकारचे प्रयत्न कितपत यशस्वी? ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात उलगडलं चित्र

Latest Marathi News Live Update : दिल्लीत पुतिन यांचे लाल कार्पेटवर स्वागत

Silent Diseases Alert: 'हे' ५ शांतीत क्रांती करणारे आजार कधीच दाखवत नाहीत लक्षणं; डॉक्टर देतात वेळीच सावध होण्याचा इशारा

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

SCROLL FOR NEXT