मुंबई

ग्रामीण भागातील तरुण-तरुणींमध्ये नवचैतन्य

CD

सुधाकर वाघ : सकाळ वृत्तसेवा
टोकावडे ता. ३ : पोलिस भरती प्रक्रिया सुरू होताच ग्रामीण भागातील तरुण-तरुणींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अर्ज भरण्याची धांदल सुरू असतानाच शारीरिक चाचणीची तयारी अनेक तरुण सकाळच्या अंधुक प्रकाशातच गावोगावच्या रस्त्यांवर उतरू लागले आहेत. पहाटेच्या शांत वातावरणात रस्त्यांवर उत्साहाची नवी चाहूल देतात. भरती गमावू नये, यासाठी तरुणांनी स्वतःला कठोर सरावासाठी बांधून घेतले आहे.
ग्रामीण भागात व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे किंवा अकादमींची संख्या अत्यल्प असल्याने बहुतेक उमेदवार स्वतःच शारीरिक तयारीचा कार्यक्रम आखतात. सकाळी सहा वाजताच अनेक तरुणांनी धावण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसते. काही तरुण ८०० मीटर ते १.६ किलोमीटर धावण्याचा सराव करतात, तर काही जण जॉगिंग, स्ट्रेचिंग, उड्या, पुश-अप्स यांसारखे व्यायाम करून शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. पोलिस भरतीमध्ये शारीरिक क्षमतेला फार महत्त्व असल्याने उमेदवारांची धडपड लक्षवेधी ठरत आहे.
कडाक्याच्या थंडीचा फटका सर्वत्र जाणवत असतानाही हे तरुण नियमित सराव करणे सोडत नाहीत. दाट दव, गारठणारा वारा आणि थंड हवेमुळे शरीर गोठत असले तरीही त्यांच्या जिद्दीपुढे हवामानाचा अडथळा क्षुल्लक ठरतो. थंडीमुळे अंग सुन्न होण्याची शक्यता असल्याने काही तरुण हलका व्यायाम करून शरीर तापवतात आणि मग धावण्यास सुरुवात करतात. गावोगावच्या रस्त्यांवर या तरुणांचा उत्साह आणि ऊर्जा पहाटेच्या वातावरणातही स्पष्ट जाणवते.
पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामीण तरुणांनी कडाक्याच्या थंडीला हरवून परिश्रमाची वाट धरली आहे. ध्येयाप्रती असलेली चिकाटी, कठोर प्रशिक्षण आणि नियमित सराव यामुळे ग्रामीण भागात भरतीची तयारी शिगेला पोहोचली आहे.

एकमेकांना प्रोत्साहन
अनेक उमेदवार आर्थिक परिस्थिती, सोयी-सुविधांचा अभाव आणि प्रशिक्षण केंद्रांच्या मर्यादा यांचा विचार न करता स्वतःच आपला सराव सुरू ठेवत आहेत. काही जण छोट्या गटांमध्ये एकत्र येऊन एकमेकांना प्रोत्साहन देतात. पोलिस भरती हा आमच्यासाठी भविष्य बदलण्याचा मार्ग आहे, असे अनेक तरुणांकडून सांगण्यात येते. त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि निर्धार हेच त्यांच्या कठोर परिश्रमाचे खरे प्रतिबिंब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : पनवेलजवळ मालगाडीचे रुळावरून घसरण्याचे प्रकरण!

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT