मुंबई

ठाकरे बंधू-महायुतीत निकराची लढाई!

CD

ठाकरे बंधू-महायुतीत निकराची लढाई!
प्रभाग १२९ मध्ये रंगतदार सामना
नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
घाटकोपर, ता. ३ ः घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग १२९ हा एन आणि एल विभागाची सामाईक सीमा असलेला महापालिकेचा प्रभाग आहे. येथे ठाकरे बंधू आणि महायुतीमध्ये निकराची लढाई पाहायला मिळणार आहे.
२०१७ ला प्रभाग १२९ मध्ये भाजप आणि शिवसेनेत कांटे की टक्कर पाहायला मिळाली. मनसेचा उमेदवार नसल्याने शिवसेनेला मतांचा अधिक फायदा झाल्याचे बोलले जाते. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ही ५५,६४० आहे. चिरागनगर, आझाद नगर, माणिकलाल इस्टेट, महेंद्र पार्क, काजूटेकडी हा परिसर मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. मराठीसह मुस्लिम, उत्तर भारतीय, गुजराती, मतदारांची संख्या लक्षणीय आहे. २०१७ मध्ये हा प्रभाग पुरुष मागासवर्ग राखीव करण्यात आला होता, तर यंदा मागासवर्ग महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे.
२०१७ मध्ये भाजपचे सूर्यकांत गवळी यांनी शिवसनेचे प्रदीप मांडवकर यांचा अवघ्या २१५ मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराने अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाची मते मिळवली, मात्र २०१७ नंतर येथील राजकीय समीकरण पूर्णतः बदलले आहे. राष्ट्रवादीचे हारून खान यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे. या प्रभागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. जी. हुले यांनी २०२२ मध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाची ताकद वाढल्याचे बोलले जाते.
ठाकरे बंधूंच्या युतीचा महायुतीला जरी फटका बसताना दिसत असला तरी अलीकडे भाजपची वाढलेली राजकीय ताकद बघता या वेळीदेखील लढत चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे. भाजप यंदा तरुण उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे आमदार पराग शहा यांनी यासंदर्भात सूचक विधान केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले की, पारशीवाडी येथील मैदानाचे सुशोभीकरण करावे. यूपीएससी, एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी अभ्यास केंद्र, पोलिस भरती देणाऱ्या विद्यार्थांना चांगले मैदान तसेच व्यायामशाळा यावर लोकप्रतिनिधींनी भर देणे आवश्‍यक असल्‍याचे ते म्‍हणाले. डोंगराळ भाग असल्याने अनियमित पाणीपुरवठा, जागृतीनगर स्थानकाजवळील नेहमीची वाहतूक कोंडी होते, अशी प्रतिक्रिया मतदार ओमकार पोटे यांनी दिली.


लोकसभा, विधानसभेतील चित्र
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय दिना पाटील हे विजयी झाले आहेत, तर विधानसभा निवडणुकीत भाजपचे राम कदम सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. या प्रभागात विधानसभेत भाजपचे आमदार राम कदम हे पिछाडीवर आहेत. ठाकरे गटाचे संजय भालेराव यांनी ५० मतांची जेमतेम आघाडी घेतली होती.

प्रमुख समस्या
डोंगरावर राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, संरक्षण भिंतींचा अभाव, डोंगरावर राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, कचरा आणि दुर्गंधीचा त्रास, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प

२०१७चा निकाल
विजयी उमेदवार- सूर्यकांत गवळी (भाजप) मते ६,९२७
प्रदीप मांडवकर-(शिवसेना) मते ६,७१२
रोशन हारून खान-(राष्ट्रवादी ) ४,९६२
अर्चना प्रद्युम्न वाघमारे-(काँग्रेस) १,९४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT