मुंबई

शास्त्रीनगर रुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांवर कारवाई

CD

शास्त्रीनगर रुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांवर कारवाई
डोंबिवलीतील साप चावून मृत्यू प्रकरण; चौकशी समितीचा ठपका
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः येथील शास्त्रीनगर रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात साप चावल्याने एका चिमुरडीसह तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाकडून मोठी हलगर्जी झाल्याची बाब उघडकीस आली आहे. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने रुग्णालयातील चार जणांवर हलगर्जीचा ठपका ठेवत कारवाई केली. त्यानुसार दोन कर्मचाऱ्यांना निलंबित, एकाला प्रतिबंधित करण्यात आले आहे. तर रुग्णालय प्रमुखांचा पदभार काढून त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
पालिका प्रशासनाने कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जाधव, परिचारिकाप्रमुख शारदा गोडसे यांचा समावेश आहे. कक्ष कामगार आशीष कांबळे यांना कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी यांच्यावर पर्यवेक्षकीय काम ढिलाईने केल्याचा ठपका ठेवत त्यांचा पदभार काढून वेतनवाढ रोखली आहे. बाल अतिदक्षता विभाग चालवणाऱ्या अल्पाइन डायग्नोसिस या बाह्यस्त्रोत संस्थेनेही हलगर्जी केल्याचे आढळल्याने त्यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या देयकातील ५० टक्के रक्कम दंड स्वरूपात कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कारवाईची मागणी
खंबाळपाडा येथील चिमुरडी प्राणवी भोईर आणि तिची मावशी श्रुती ठाकूर यांना विषारी साप चावल्यानंतर उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले होते, मात्र त्या वेळी संबंधित डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप चौकशीत सिद्ध झाला आहे. दोघींनाही पुढे ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकाराविरोधात कुटुंबीयांसह विविध राजकीय पक्षांनी आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, दीपेश म्हात्रे, सत्यवान म्हात्रे यांच्यासह विविध नेत्यांनी सखोल चौकशीसाठी पालिकेला निवेदन दिले होते.

अनुभवी डॉक्टरांची मागणी
अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त प्रसाद बोरकर, उपायुक्त वंदना गुळवे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांच्या समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे. रुग्णालयात नवीन मुख्य वैद्यकीय अधिकारी नेमण्याच्या हालचालीही सुरू असून, अनुभवी डॉक्टरांना नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT