मुंबई

आरडीसीए आयोजित सोळा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

CD

आरडीसीए आयोजित १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
पोयनाड, ता. ३ (बातमीदार) : आरडीसीएच्या वतीने नुकत्याच रायगड जिल्ह्यातील विविध मैदानांवर १६ वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण २८ क्रिकेट अकॅडमी व क्लबच्या संघांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला. ही स्पर्धा रायगड जिल्ह्यातील पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, खारघर येथील बी. पी. पाटील मैदान, घरत क्रिकेट मैदान, पनवेल येथील फोर्टी प्लस गावदेवी क्रिकेट मैदान टेंभोडे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उलवेसह अन्य उपलब्ध होणाऱ्या मैदानांवर खेळवली जाणार असून, स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद फेरीनुसार होणार आहे.
स्पर्धेत जवळपास ५० एकदिवसीय ४० षटकांच्या सामन्यांचे आयोजन आरडीसीएतर्फे करण्यात येणार आहे. स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच्या आधारावर खेळाडूंची निवड रायगड जिल्ह्याच्या संघात होणार असून, निवडलेला संघ पुढे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित दोनदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल. याआधी आरडीसीएच्या वतीने १४ व १९ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच एमसीएतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील आंतरजिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्याचा संघ सुपर लिगमध्ये पात्र ठरला आहे. त्‍यामुळे अशा स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवा क्रिकेट खेळाडूंना आपले कौशल्य मैदानावर दाखवण्याची संधी मिळत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. सातत्याने रायगड जिल्ह्यातील युवा गटातील खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळाची कामगिरी केली असल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा लेदर बॉल क्रिकेटसाठी सुगीचे दिवस आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Accident : टायर फुटून क्रूझर थेट ट्रकवर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू; गाडीचा चुराडा

Latest Marathi News Live Update : मुंबईत एसीबीची मोठी कारवाई! सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडलं

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

Google चा मोठा खुलासा! Zero Day मुळे धोक्यात आलेत 3.5 अब्ज क्रोम वापरकर्ते; आत्ताच 'हा' एक बदल नाही केला तर डेटा होऊ शकतो गायब

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT