मुंबई

बाल निरीक्षण सुधारगृहात अल्पवयीन मुलींमध्ये मारहाण

CD

बाल निरीक्षण सुधारगृहात अल्पवयीन मुलींमध्ये हाणामारी
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) ः शहरातील गांधी रोड परिसरातील मुलींच्या बाल निरीक्षण सुधारगृह आणि विशेषगृहात अल्पवयीन मुलींमध्येच हाणामारीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. २) सकाळी ८ वाजता पाणी भरण्यावरून सुरू झालेल्या एका किरकोळ वादाने क्षणातच हिंसक रूप धारण केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुधारगृहात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने तिच्यासोबत राहणाऱ्या दुसऱ्या मुलीला ‘तू पाणी का भरत नाहीस?’ असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. वाद वाढल्यानंतर आरोपी मुलीने पीडित मुलीला हाताच्या ठोश्याबुक्क्यांनी मारले. त्यानंतर जवळच पडलेला लाकडी दांडका उचलून पीडित मुलीच्या उजव्या मांडीवर मागील बाजूने जोरात प्रहार केला. या झटापटीत पीडित मुलीच्या तोंडालाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.

सुधारगृहातील अधिपरिचारिका सुनीता कांबळे यांनी ही घटना पाहताच तातडीने हिललाइन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा (कलम) नोंदवून तपास सुरू केला आहे. मारहाण झालेल्या दोन्ही मुली सध्या सुधारगृहातच दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: भावी अधिकाऱ्यांचे भवितव्य टांगणीला! ‘एमपीएससी’ला अंतिम निकालाचा मुहूर्त मिळेना, जाहिरात निघून दोन वर्षे उलटली..

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, सरकारने जारी केली ही महत्त्वाची नोटीस

Solapur News: २० टक्के प्रमाणपत्रे खोटी! साेलापूरात कामगारांना अनुभव प्रमाणपत्र देणारे ठेकेदारही बोगस;'कामगार मंडळा’कडून तपास सुरू..

Ajay Devgn: ‘शैतान २’चा इशारा? दोन वर्षांनंतर अजय देवगच्या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढवली!

Latest Marathi News Live Update : वाळुज एमआयडीसीतील उद्योगांवर गॅस टंचाईचा परिणाम

SCROLL FOR NEXT