मुंबई

मौजे सानपाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने ४ डिसेंबरला दत्त जन्मोत्सव सोहळा

CD

दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
मौजे सानपाडा देवस्थानच्या वतीने ४ डिसेंबरला दत्त जन्मोत्सव सोहळा

तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर पट्टीतील सर्वात पुरातन देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे सानपाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने ४ डिसेंबरला दत्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये चार दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.
श्री गुरुचरित्र पारायण सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत होणार असून, ह.भ.प. दगडू वास्कर हे वाचक आहेत. दररोज पहाटे ४ ते ६ पर्यंत काकड आरती, सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत हरिपाठ व आरती, सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत भजन, रात्री ९ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत कीर्तन होत आहे. ह.भ.प. विनीत म्हात्रे (डोंबिवली), ह.भ.प. ज्ञानराज महाराज (कोपरखैरणे), ह.भ.प. वृंदावनताई गौरी (देवाची आळंदी), ह.भ.प. श्रीकांत महाराज दुराफे (आळंदी) यांनी सप्ताहातील कीर्तने सादर केली आहेत.
४ डिसेंबरला पहाटे ५ वाजता सुवर्ण पादुकांवर अभिषेक आणि श्री गुरुचरित्र पारायण समाप्ती कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिवसभर शहरातील विविध भजनी मंडळांद्वारे भजने सादर केली जाणार आहेत. श्रीदत्त जन्माचे कीर्तन सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वारकरी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर हे सादर करणार आहेत. सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ७.३० नंतर पालखी मिरवणूक होणार आहे. ही पालखी सिताराम मास्तर निवास ते श्रीदत्त मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा व गावदेवी मंदिरपर्यंत असणार आहे.
तुर्भे सेक्टर २० येथील श्रमिक सहयोग मंडळ व शिवप्रेमी मित्र मंडळ यांच्या वतीने श्रीदत्त जयंती उत्सव होणार आहे. यामध्ये सकाळी ६ ते ७ वाजता श्रीदत्ताभिषेक व महाआरती, सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत होमहवन, दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर, सायंकाळी ५ वाजता श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ६.३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव पाळणा आणि महाआरती, रात्री ८ ते १० महाप्रसाद, रात्री ९ वाजता महाराष्ट्रातील मंगळवेढा सोलापूर येथील भारुड होणार आहे. ह.भ.प. पांडुरंग महाराज गवळी व ह.भ.प. रघुनाथ महाराज बिरादार (सहकलाकार) हे भारुड सादर करणार आहेत.


सिवुड्समध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठापना

सिवुड्स सेक्टर ४६ येथील श्री शनैश्वर मंदिर येथे श्रीदत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, सकाळी १०.३० ते सकाळी ११.३० वाजेपर्यंत श्री समर्थ सद्गुरू अविनाश महाराज यांचे प्रवचन, सायंकाळी ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रामानंद संप्रदाय भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ७:३० वाजता महाआरती आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT