मुंबई

कल्याण पश्चिमेत पाणी बाणीसह वाहतूक कोंडी

CD

मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनी फुटली
कल्याण पश्चिमेत पाणी समस्या; २२ तासांच्या प्रयत्नाने पुरवठा सुरू
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पत्रीपूल रस्त्यादरम्यान ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी मेट्रोच्या कामामुळे फुटली. यात लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना मंगळवारी (ता. २) घडली. यामुळे पाणीपुरवठा वितरण व्यवस्था कोलमडल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली. तर संदर्भीत रस्ता परिसरात दुरुस्ती कामामुळे वाहतूक कोंडी झाली. समस्या निर्माण झाल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहनचालकांना विलंबाने जाण्याचा प्रसंग उद्भवला.

कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पत्रीपुलाकडे जाणारा मुख्य रस्ता एमएमआरडीएच्या अधिपत्याखाली असून या रस्त्यामध्ये मेट्रोचे काम सुरू असून मंगळवारी केडीएमसीच्या ७०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी या कामात फुटली. ती केडीएमसीच्या प्रशासनाने २२ तासांच्या प्रयत्नाने बुधवारी सकाळी दुरुस्त केली, नंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. या कामामध्ये एमएमआरडीए, तसेच मेट्रो व्यवस्थापन, केडीएमसी प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने या घटनेमुळे पाणीबाणी समस्येसह वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्यांना बसला. तर याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांनी सांगितले, की ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी मेट्रोच्या कामात मंगळवारी फुटल्याने तातडीने युद्धपातळीवर दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT